फायरफ्लाय फायर पंप्सने लॉंच केला FIRE WARRIOR: विविध क्षेत्रांसाठी उच्च-प्रदर्शन अग्निशमन उपाय

शियातील सर्वात मोठे अग्निशमन पंप उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदार असलेल्या फायरफ्लाय फायर पंप्सने नवीन उच्च-प्रदर्शन अग्निशमन पंप, FIRE WARRIOR लॉन्च केला आहे. हा पंप विविध क्षेत्रांमध्ये वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून, उच्च-प्रदर्शन, विश्वासार्हता आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. 150 LPM at 18 BAR पंप क्षमता आणि मोबाईल डिझाइनमुळे हा पंप आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद आणि प्रभावी पाणी पुरवठा करू शकतो.

FIRE WARRIOR ची दुहेरी पंप प्रणाली आणि खुले जलस्रोतांमधून पाणी शोषण्याची क्षमता यामुळे तो विविध ठिकाणी वापरण्यास योग्य आहे. हा पंप विशेषतः टोल प्लाझा, दुर्गम औद्योगिक ठिकाणे, रिसॉर्ट्स, लहान नगरपालिकांसाठी आदर्श आहे, जिथे तो स्वतंत्र अग्निशमन साधन म्हणून काम करू शकतो.

फायरफ्लाय फायर पंप्सचे संचालक, श्री. रोहित माळी म्हणाले, “FIRE WARRIOR च्या लाँचसह, फायरफ्लाय फायर पंप्सने अग्निशमन तंत्रज्ञानात एक महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. हा नवीन पंप उद्योग आणि संस्थांना अग्निशमन आपत्कालीन परिस्थितीला अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाण्यास मदत करतो. आम्ही महाराष्ट्रातील एक प्रमुख अ‍ॅग्रो-टुरिझम रिसॉर्टमध्ये FIRE WARRIOR ची यशस्वी डिलिव्हरी केली आहे.”

फायरफ्लाय फायर पंप्स विषयी: १९६३ मध्ये स्थापन झालेली, फायरफ्लाय फायर पंप्स प्रा. लि. एशियातील सर्वात मोठे अग्निशमन पंप उत्पादक, पुरवठादार आणि निर्यातदार आहे. कंपनीने जगभरात १६,५००+ अग्निशमन पंप्स स्थापित केले आहेत आणि त्यांच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांनी फायरफ्लायला अग्निशमन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे.