डेक्कन इलेव्हन एफसी ‘अ’कडून रूपाली एससीचा धुव्वा

By: Editor_Manas

On: Friday, August 16, 2024 1:24 PM

Google News
Follow Us

पुणे, 16 ऑगस्ट 2024: पीडीएफए सुपर डिव्हिजन फुटबॉल लीगमध्ये डेक्कन इलेव्हन एफसी ‘अ’ टीमने रूपाली एससीला 7-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत करताना पूर्ण तीन गुण वसूल केले.

गंगा लीजेंड्स, बावधन मैदानावर सुरू असलेल्या लीगमधील अन्य एका सामन्यात परशुरामनियन्स एससी आणि देहू रोड येथील इंद्रायणी एससी यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली. परशुरामियन्ससाठी शाहिद खानने (१२व्या) खाते उघडले. मात्र, मंदार पठारेने (६१व्या) उत्तरार्धात गोल करताना बरोबरी साधली.

त्यापूर्वी, झालेल्या सामन्यात, डेक्कन इलेव्हन एससीने ‘अ’ टीमने रूपाली एससीवर वर्चस्व राखले. साद शेख (4 था, 90वा) आणि यश महापात्राने (21वा, 61वा) प्रत्येकी दोन गोल करताना विजयाचा मोलाचा वाटा उचलला. यश माळकर्णेकर (7वा), रोहन गोगटे (25वा) आणि ईशान सुमंत (89वा) यांनी प्रत्येकी एक गोल करताना त्यांना चांगली साथ दिली.

प्रतिस्पर्धी रूपाली एससीने क्लीन शीट टाळली. त्यांच्याकडून एकमेव गोल मनीष ठाकरेने (६७व्या) केला.

निकाल:

डेक्कन इलेव्हन एफसी ‘अ’: 7(साद शेख 4 था, 90 वा; वेदांत माळकर्णेकर 7 वा; यश महापात्रा 24 वा, 61 वा; रोहन गोगटे 25 वा; इशान सुमंत 89 वा) विजयी वि. रूपाली एससी: 1 (मनीष ठाकरे 67वा).

परशुरामियन्स एफसी: 1 (शाहिद खान 12वा) बरोबरी वि. इंद्रायणी एससी: 1 (मंदार पठारे 61वा).

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026