विंग कमांडर शशिकांत ओक यांचा ७५ वा जन्मदिन सोहळा पुणे येथे पार पडला !

By: Editor _2

On: Monday, August 5, 2024 11:51 AM

Google News
Follow Us

७५ वा जन्मदिन सोहळा

जन्म दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ! 

पुणे, ४ ऑगस्ट –  येथील श्री स्वामी कृपा सभागृह, मयूर कॉलनी,कर्वेरोड, कोथरूड या ठिकाणी ४ ऑगस्ट या दिवशी विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या ७५ व्या जन्म  दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सर्वप्रथम ७५ दिव्यांनी त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर विविध ऋचांचे मंत्रपठण केल्यावर पुरोहितांनी त्याचा उद्देश आणि अर्थ ही सांगितला. तिथे जमलेल्या बालमित्रांनी, नाडी भविष्य प्रेमींनी, मिलिटरीच्या स्नेहींनी ओकांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यानंतर ‘ऑफिसर्स करीयर अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ सादर केला. आणखी एका नाटिकेतून त्यांचा जीवन प्रवास सादर करण्यात आला. 

             

     या कार्यक्रमाला एयर मार्शल सुनीत सोमण, मेजर जनरल शिशिर महाजन, ब्रिगेडियर हेमंत महाजन, ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, विंग कमांडर केळकर, तोडकर, तबीब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कालीचरण महाराज, चितळेबाबा, नाडी वाचक ईश्वरन प्राचार्य अद्वयानंद गळतगे आदि अनेक मान्यवरांच्या उपस्थित चित्रफीत दाखवली गेली. तसेच यावेळी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते. 

                 

आप्त,नातेवाईक,मान्यवर यांचेकडून शुभेच्छा ! 

श्री ओक यांचे आप्त,नातेवाईक,मान्यवर तसेच त्यांचे आतापर्यंत संपर्कात असणाऱ्या संस्था,संघटना यांनी शुभेच्छा दिल्या आणि ओक यांना विविध प्रकारे भेट वस्तू देवून त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांचा सन्मान केला.याप्रसंगी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना भेट वस्तू देवून गौरवण्यात आले.सनातन परिवाराच्या वतीनेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026

September 16, 2026