मिस्टर मिस मिसेस किड्स इंडिया २०२४ शो चे आयोजन : फॅशन डायरेक्टर उद्धव खरड

यू येस स्क्वेअर मेडिया अँड पब्लिसिटी आयोजित मिस्टर मिस मिसेस किड्स इंडिया २०२४ या शो आयोजन मोठ्या दिमाखात होण्याचे दिसत आहे .

मिस्टर एशिया आणि मिस्टर इंडिया पदक घेतलेले भारतातील जुबेर शेख यांची प्रमुख पाहुणे म्हणून नियुक्ती झालेली आहे .
जुबेर शेख हे बॉडी बिल्डर असून एक अप्रतिम मॉडल देखील आहेत. अनेक तरुणांचे हे आदर्श आहेत.

मुंबई ची मॉडेल नम्रता गांधी या शो मध्ये गेस्ट मॉडेल म्हणून हजेरी लावणार आहेत . त्या आय टी क्षेत्रात काम करत असून मॉडेलिंग शो मध्ये शो स्टॉपर वॉक साठी जातात आणि बर्‍याच सौंदर्य स्पर्धेत विजेते पदक मिळवले आहे. मॉडेल प्रीती रस्तोगी ज्यांनी काही दिवसांपूर्वी “रक्षक” वेब सीरीज मध्ये काम केले व Mrs. India Earth चे विजेते, ह्यांना गौरव पुरस्कार देण्यासाठी या शो मध्ये आमंत्रित केले आहे .

मॉडेल श्रद्धा बरहाटे यांचा ही गेस्ट मॉडेल म्हणून या शो मध्ये सन्मान होणार आहे.

पुन्हा एकदा मॉडल तृप्ती भोसले ह्यांचा शो स्टॉपर वॉक पुण्याच्या दर्शकांना बघण्याची संधी मिळेल.

या शो मध्ये वेगवेगळ्या राज्यातील , जिल्ह्यातून स्पर्धक भाग घेत आहेत .

सुंदर मॉडेल्स , फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट चा एकत्र जलवा या शो मध्ये दिसणार आहे . शो चे आयोजन व डिरेक्शन उद्धव खरड करत आहेत , त्यांनी खुप फॅशन शो केलेले असूने हा शो एक ड्रीम शो आहे म्हणजे नक्कीच हा शो मोठ्या लेवल ला होणारच .

हा शो पुण्यातील पंच तारांकित होटल हयात रिजेन्सी पुणे येथे ४ ऑगस्ट २०२४ या रोजी होणार आहे. पुण्यातील व पुणे बाहेरील ब्रँड ओनर, फॅशन पार्टनर, मेडिया पार्टनर, फिल्म डायरेक्टर , स्पॉन्सर व शो ज्युरी च्या हजेरीत हा शो होणार आहे .