इंटरसिटी स्मार्टबसच्या पश्चिम भारतातील ताफ्याचा विस्तार

● या क्षेत्रात ब्रँड ५० मार्गांची भर घालणार
● वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी ताफ्यात ३०० टक्क्यांनी वाढ करणार
● पश्चिमेत वॉशरूमने सज्ज १०० बसेसची भर घालून प्रवाशांची सुविधा व आराम वाढविणार
● उन्हाळ्यातील वाढीच्या पार्श्वभूमीवर ९८ टक्के ऑक्युपंसीसह पश्चिम भारत अग्रेसर

भारतातील अग्रगण्य आंतरशहर प्रवास प्लॅटफॉर्म असलेल्या इंटरसिटी स्मार्टबस मुंबई व पुण्यावर लक्ष केंद्रित करून पश्चिम भारतात विस्ताराची उत्साहाने घोषणा करत आहे. या क्षेत्रात ५० अधिक मार्ग वाढविण्याची ब्रँडची योजना आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेच यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात मागणीमध्ये भरीव अशी ६० टक्क्यांनी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांचा पश्चिम क्षेत्रात समावेश होतो. या वाढीमध्ये हा प्रदेश अग्रेसर असून येथील सरासरी ऑक्युपंसी दर ९८ टक्के एवढा आहे.

ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि या प्रदेशातील दळणवळण सुधारण्यासाठी कंपनी येत्या वर्षात आपला ताफा ३०० टक्क्यांनी वाढविण्यासाठी सज्ज आहे. तसेच कंपनी पश्चिम क्षेत्रात वॉशरूमने सज्ज असलेल्या १०० बसेसची भर घालणार असून यामुळे प्रवाशांची सुविधा व आराम लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे.

मुंबई, पुणे, गोवा आणि इंदूर येथे नुकतेच एक्सक्लुझिव्ह बोर्डिंग लाऊंज सुरू करण्यात आले आहेत. त्यातून प्रवाशांना सुरक्षित व आरामदायक बोर्डिंगचा अनुभव देण्यासाठीची कटिबद्धता आणखी अधोरेखित झाली आहे. पुढील तिमाहीत आणखी बोर्डिंग लाऊंज सुरू करण्याचे नियोजन आहे.

सातत्यपूर्ण प्रयोगशीलता आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक याद्वारे प्रवाशांच्या समाधानाला ब्रँड प्राथमिकता देत आहे. कंपनीच्या विस्तारित ताफ्यामुळे संपूर्ण पश्चिम भारतातील प्रवाशांना अधिक वारंवार सेवा, विस्तारित मार्ग आणि सुधारित प्रवासाचा अनुभव मिळणे शक्य होईल.

या विस्ताराविषयी बोलताना इंटरसिटी स्मार्टबसचे रिजनल हेड (वेस्ट) धर्मेशकुमार म्हणाले, “गतिमान अशा पश्चिम क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. प्रवासाचे सुरक्षित, आरामदायक आणि विश्वासार्ह पर्याय देण्याबद्दलचे आमचे समर्पण कायमच आहे. मुंबई व पुण्यात आमची उपस्थिती वाढविणे ही आमच्या ग्राहकांच्या उभरत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम भारतात अखंड दळणवळण कायम ठेवण्यासाठीचे एक धोरणात्मक पाऊल आहे.”

या सेवेत उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी अनेक सोईसुविधांनी सुसज्ज असलेल्या लक्झरी बसेस उपलब्ध आहेत. या बसेसमध्ये अंतर्गत वॉशरूम, पुरेशा जागेसह स्लीपर बर्थ आणि लांब पसरून आरामशीर बसण्यासाठी विशाल आसने आहेत. यामुळे प्रवाशांना सहज व आरामदायक प्रवासाची हमी मिळेल. रिअल टाईम जीपीएस ट्रॅकिंगच्या माध्यमातून वक्तशीर, विश्वासार्ह आणि सुरक्षित प्रवाशाची हमी मिळेल.

कंपनीच्या सेवेच्या यादीत नुकतीच एक भर पडली, ती म्हणजे डिजिटल लगेज टॅग या वैशिष्ट्याची. डिजिटल लगेज टॅगिंग प्रणालीमुळे सामान हरविण्याची किंवा चुकीने हाताळले जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे प्रवासी सामान गमावण्याची चिंता न करता सुरळीतपणे प्रवास करू शकतील. या प्रगत प्रणालीमुळे सामानाची हाताळणी सोपे होते आणि प्रवासी त्यांच्या सामानाबद्दल निश्चिंत होतात.

इंटरसिटीबद्दल :
इंटरसिटी हा भारतातील आघाडीचा आंतरशहर मोबिलिटी प्लॅटफॉर्म असून तो माफक खर्च करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे आणि बस या दोन्ही सेवा देतो. त्याचा प्रमुख ब्रँड इंटरसिटी स्मार्टबस हा १६ राज्यांमध्ये ६३० पेक्षा अधिक मार्गांवर कार्यरत असून भारतातील लांब-अंतराच्या मार्गांवर सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रमाणित प्रवासाचा पर्याय प्रदान करतो. त्याचा सहकारी ब्रँड रेलयात्री हा रेल्वे प्रवासाची सर्वसमावेशक माहिती पुरवतो आणि दर महिन्याला १ कोटी ४० लाखांहून अधिक वापरकर्त्यांना सेवा देतो.