जीवनात आनंदी राहायचे असेल, तर गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनापासून नियमित साधना करण्याचा दृढ संकल्प करूया ! – सद्गुरू स्वाती खाड्ये

By: Editor _2

On: Monday, July 22, 2024 4:04 PM

Google News
Follow Us
सनातन संस्था आयोजित ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भक्तिमय वातावरणात साजरा !
   चिंचवड – सध्या बहुतेकांचे दैनंदिन जीवन हे धावपळ आणि चिंता यांनी ग्रासलेले आहे. मनःशांती हरवली आहे. ताणतणाव हा तर आयुष्याचाच एक भाग झाला आहे. शाळेत जाणारे अगदी लहान मूल असू दे किंवा कुणी वयोवृद्ध असू दे, आज जवळपास प्रत्येकालाच दैनंदिन जीवनात ताण तणावाचा सामना करावा लागतो. आपण शिक्षण घेतांना इतिहास, भूगोल, गणित असे अनेक विषय शिकतो; पण आपल्याला आनंद कसा मिळवायचा ?, हे कुठेच शिकवले जात नाही. हे सर्व साधनेने शक्य होत असून या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनाच करायला हवी. मनःशांती, समाधान, आनंद या गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत, तर त्या साधनेमुळेच मिळू शकतात. आत्मसुख प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे अध्यात्म ! व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनापासून नियमित साधना करण्याचा दृढ संकल्प करूया असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाड्ये यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित ऑनलाइन सत्संगातून मार्गदर्शन करताना केले.देशभरात 75 ठिकाणी महोत्सव साजरा करण्यात आला. चिंचवड आणि तळेगाव येथे 2 ठिकाणी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.
     जी.एम. के बॅक्वेट रावेत, या ठिकाणी झालेल्या महोत्सवात हिंदुंच्या मंदिरांच्या समस्या आणि मंदिर सरकारीकरण याविषयी माजी जिल्हा न्यायाधीश आणि माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच कु. क्रांती पेटकर यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. तर अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे येथे झालेल्या महोत्सवात विश्व हिंदु परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारी सदस्य श्री. विवेक सिन्नरकर यांनी स्वा.सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रभक्ती याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. स्व रक्षण प्रात्यक्षिके ही दाखवण्यात आली. तसेच अध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन, सात्त्विक उत्पादन कक्ष आणि धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला !
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026

March 20, 2026