निबावकडून पुण्यातील घरकुलांसाठी एआय-सक्षम सीरीज ४ होम लिफ्ट्स सादर

भारतातील सर्वात मोठा घरगुती ब्रँड असलेल्या निबाव लिफ्ट्सने तंत्रज्ञानातील आपल्या सामर्थ्याच्या बळावर सर्वात प्रगत अशा निबाव सीरीज ४ होम लिफ्ट्स पुण्यात सादर केल्या आहेत. या नवीन सादर केलेल्या लिफ्टमध्ये एआय-सक्षम केबिन डिस्प्ले, काटेकोर संचालनासाठी इन्ट्यूटिव्ह एलओपी डिस्प्ले लिडार २.० तंत्रज्ञान आणि हळूवार लँडिंग अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत.

त्यामुळे घरगुती इलेव्हेटर्सच्या क्षेत्रात ती अशा प्रकारचे पहिलेच उत्पादन ठरणार आहे. मिडनाईट ब्लॅक या एकमेव आवृत्तीत सादर झालेल्या निबाव सीरीज ४ लिफ्ट्समध्ये हवेवर चालणाऱ्या कोणत्याही लिफ्टमध्ये सर्वात मोठी केबिनची जागा आहे. निबाव सीरीज ४ लिफ्ट्स या वातावरणानुकूल प्रकाशयोजना, न्यूझिलंड वूल कार्पेट, स्टारलाईट छत, लेदर फिनिश अंतर्भाग आणि अन्य अनेक शैलीदार घटकांनी सज्ज आहेत. हडपसरचे माजी आमदार श्री. महादेव बाबर यांनी निबाव ब्रँडच्या प्रमुख पुणे एक्सपीरियंस सेंटरमध्ये निबाव होम लिफ्ट्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या उपस्थितीत या नवीन उत्पादनाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी बोलताना निबाव लिफ्ट्सचे सीईओ आणि संस्थापक श्री. विमल बाबू म्हणाले, “निबाव सीरीज ४ होम लिफ्ट्स हे आमचे सर्वात नवीन प्रयोगशील उत्पादन सादर करताना व बाजारपेठेत आणताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या निबाव सीरीज ४ होम लिफ्ट्सच्या माध्यमातून आम्ही तंत्रज्ञान आणि डिझाईन या दोन कळीच्या घटकांचा मिलाफ घडविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

त्यामुळे ती घरातील अंतर्भागात भर घालणारी एक स्टेटमेंट ठरते. सुरक्षा आणि टिकाऊपणा यांच्यासाठी बाजारपेठेत आमचा ब्रँड ओळखला जातो. निबाव सीरीज ४ च्या माध्यमातून आम्ही नवीन मानक स्थापित केले असून अतुलनीय दर्जा उपलब्ध करून दिला आहे. आमच्या सीरीज ४ लिफ्ट्सने घरमालकांना निश्चितच लाभ होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

सुरक्षेच्या वैशिष्ट्यांची नवीन निकष प्रस्थापित करत निबाव सीरीज ४मध्ये आणीबाणीच्या परिस्थितीत सुटका करणाऱ्या टीमसाठी जलद व सुरक्षित मदतकार्यासाठी रॅपिड रेस्क्यू लॅच (आरआरएल) समाविष्ट करण्यात आले आहे. आरआरएलमुळे पॉलिकार्बोनेट काच सहजतेने काढता येते, त्यामुळे कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवाशांची जलद सुटका होण्याची निश्चिती होते.

कार्बन सील मोटार २.० स्थापित केली असल्यामुळे निबावने सीरीज ४ लिफ्ट्सचा टिकाऊपणा वाढविला आहे. त्यामुळे दीर्घकालीन कामगिरी व विश्वासार्हता यांची हमी मिळते. नवीन होम लिफ्ट्स या जीएसएम कनेक्टिव्हिटीनेही सक्षम आहेत, त्यामुळे वापरकर्त्यांना कमाल सुरक्षा व लवचिकता मिळते.

सीरीज ३ लिफ्ट्सची लँडिंगसुद्धा विना केबल आहे. यात केबिन पिल्लरसाठी मोकळीक व उठाव, लेदर फिनिश, नियंत्रण असलेले छुपे पंखे, डिजिटल व अॅनालॉग घड्याळांसह टच स्क्रीन डिस्प्ले अशी उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत आणि त्या हातांच्या इशाऱ्यांनी (गेश्चर) नियंत्रणाने सक्षम आहेत.

निबाव सीरीज ४ लिफ्ट्सची किंमत १२.४९ लाख रुपये अशी किफायती आहे आणि ३९.९९९ /महिना इथपासून शून्य व्याज ईएमआयवरही त्या उपलब्ध आहेत. दुकान क्र. १, पॅलॅझो कोंडोमिनियम, विझडम वर्ल्ड स्कूल, अॅमनोरा डिएसके रोड, पुणे इथे असलेल्या निबावच्या इको सेंटरमध्ये एस४ लिफ्ट्सचा अनुभव घेता येईल. अधिक माहितीसाठी ग्राहक ७८२४८१२१२१ या मोबाईल नंबर वर संपर्क करू शकतात.