मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा : गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ

भारताच्या कानाकोपर्‍यात लाखो मंदिरे आहेतमंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहेमात्र सध्याच्या काळात मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जातेयातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत पडून रहातेत्याचा धर्माला काही उपयोग होत नाहीदुसरीकडे पडझड झालेल्या जीर्ण मंदिरांकडे कोणीही लक्ष देत नाहीत्यामुळे भाविकांच्या दानाचा पैसा हा बँकेत पडून रहाण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरणे आवश्यक आहेहे पुनर्निर्माणाचे कार्य करतांना पुरातन मंदिरांची संरचना सुरक्षित राखणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन ‘समस्त महाजन संघा’चे कार्यकारी विश्वस्त श्रीगिरीश शहा यांनी केले. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी ते ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ यावर बोलत होते.

    या प्रसंगी ‘मंदिराचे अर्थशास्त्र’ यावर बोलतांना श्रीअंकीत शहा म्हणाले, ‘‘विनामूल्य देण्याची पद्धती कार्ल मार्क्स याने रूढ केली आणि मतांच्या राजकारणातून ती वाढलीयाउलट भारतीय अर्थशास्त्र मनुष्याला आत्मनिर्भर बनवतेसनातन धर्मामध्ये मंदिरांच्या अर्थकारणातून शिक्षणप्रणाली चालवली जात होतीमंदिरामधील अर्थव्यवस्थेवरून गावांची निर्मिती होत होतीभारतातील शिक्षणपद्धती मंदिराच्या अर्थकारणातून चालत होतीऋषीमुनी अभ्यासक्रम निश्चित करत होतेमंदिरांची अर्थव्यवस्था नष्ट झाल्यामुळेच भारतात साम्यवाद आणि भांडवलशाही आलीत्यामुळे सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी पुन्हा एकदा समाजाला मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्थेचे ज्ञान देण्याची आवश्यकता आहे.

मंदिरातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले पाहिजे – पूप्रापवन सिन्हा गुरुजीपावन चिंतन धारा आश्रम

 पुरोहितांनी मंदिरात येणार्‍या हिंदूंना टिळा लावण्यासमवेत त्यांना धर्माचे शिक्षणही दिले पाहिजेअसे झाल्यास त्यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतीलसध्याच्या काळात हिंदु धर्माविषयी निधर्मींकडून केला जाणारा अपप्रचार खोडून काढण्यासाठी पुरोहितांकडून शास्त्राचे प्रामाणिक ज्ञान मिळणे आवश्यक आहेमंदिरात जातांना काही नियम असले पाहिजेतमंदिरात स्वच्छतेची सेवा केल्याखेरिज व्यक्तीची चेतना जागृत होऊ शकत नाहीअसे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील ‘पवन चिंतन धारा आश्रमा’चे पूप्रापवन सिन्हा गुरुजी यांनी केले.
      या प्रसंगी माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख म्हणाले, ‘‘मंदिरांनी त्यांचे व्यवस्थापन सरकारच्या ताब्यात जाऊ नये यांसाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहेयात प्रामुख्याने विश्वस्तांनी ‘महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट अनिनियम १९५०’चे पालन करणेविश्वस्तांनी विसंवाद होऊ नये यांसाठी प्रयत्न करणेमंदिराचे व्यवस्थापन चांगले ठेवणेमंदिरांनी त्यांचे अंदाजपत्रक वेळेत करणेमंदिरांनी त्यांची अचल आणि चल मालमत्तेविषयी नोंदणी ठेवणेअशा कृती करणे अपेक्षित आहेया गोष्टींसमवेत भाविकांनी त्याच मंदिरांना दान द्यावे जी मंदिरे सरकारच्या ताब्यात नाहीत.’’
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने कांची कामकोठी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती आणि प.पूगोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वादरूपी संदेश पाठवला आहेया वेळी पूप्रापवन सिन्हागुरुजी यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या गुजराती ‘ईबुक’चे प्रकाशन करण्यात आले.