मे २०२४ : टीबीओ टेक लिमिटेड (“द कंपनी” किंवा “टीबीओ”) या कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या बुधवारी, दि. ८ मे २०२४ रोजी सुरू होणार आहे. ही विक्री शुक्रवारी, दि. १० मे २०२४ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवारी ७ मे २०२४ रोजी असेल.
या आयपीओसाठीचा किंमतपट्टा ८७५ रु. ते ९२० रु. प्रति इक्विटी शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान १६ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १६ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
आयपीओच्या या ऑफरमध्ये ४०० कोटी रुपयांच्या नवीन इक्विटी शेअर्सची विक्री (फ्रेश इश्शू) आणि १२,५०८,७९७ इक्विटी शेअर्सची ठराविक भागधारकांद्वारे विक्री (ऑफर फॉर सेल) यांचा समावेश आहे. (‘फ्रेश इश्शू’ व ‘ऑफर फॉर सेल’ यांचा एकत्रित उल्लेख ‘ऑफर’ असा येथे करण्यात येत आहे.)
ऑफरमधील फ्रेश इश्शूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहेः (i) नवीन खरेदीदार (खाली उल्लेख केल्याप्रमाणे) आणि पुरवठादार यांना नियुक्त करून आपल्या प्लॅटफॉर्मची वाढ करणे व ते बळकट करणे. यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश असेल.. (a) कंपनीद्वारे तंत्रज्ञान आणि डेटा सोल्यूशन्समध्ये १३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणे, (b) कंपनीची मटेरियल उपकंपनी असलेल्या टेक ट्रॅव्हल्स डीएमसीसीमध्ये प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मार्केटिंग व प्रमोशन या यांच्या माध्यमातून ऑनबोर्डिंग करून घेण्यासाठी, तसेच भारताबाहेर पुरवठादार व खरेदीदार नियुक्त करण्याकरीता विक्री व कंत्राटी कर्मचारी नेमण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करणे, (c) भारतात संस्थेच्या वाढीच्या योजना राबविण्याकरीता विक्री, विपणन व पायाभूत सुविधा यांमध्ये २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणे, आणि (ii) अज्ञात अजैविक अधिग्रहण आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी ४० कोटींची तरतूद करून ठेवणे. (“ऑबजेक्ट्स ऑफ द ऑफर”)
आयपीओच्या ऑफर फॉर सेलमध्ये गौरव भटनागर यांच्याकडील २,०३३,९४४ इक्विटी शेअर्स, मनीष धिंग्रा यांच्याकडील ५७२,०५६ इक्विटी शेअर्स, एलएपी ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील २,६०६,००० इक्विटी शेअर्स (या सर्वांचा येथे एकत्रितपणे उल्लेख ‘प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स’ म्हणून करावा); टीबीओ कोरिया होल्डिंग्ज लिमिटेड यांच्याकडील २,६३७,०४० इक्विटी शेअर्स आणि ऑगस्टा टीबीओ (सिंगापूर) पीटीई यांच्याकडील ४,६५९,७५७ इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे. (यांचा येथे एकत्रितपणे उल्लेख ‘इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स’ म्हणून करावा). (प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आणि इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्स यांना एकत्रितपणे “सेलिंग शेअरहोल्डर्स” म्हणून ओळखले जावे.)
या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या सदस्यत्वासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद राकून ठेवण्यात आली आहे. (“एम्प्लॉई रिझर्व्हेशन पोर्शन”) ऑफरमधील इक्विटी शेअर्स २८ एप्रिल २०२४ रोजी नवी दिल्ली येथील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली व हरियाणा (आरओसी) यांच्याकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जात आहेत. (“रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस” किंवा “आरएचपी”)
संपूर्ण तपशीलासाठी कृपया कंपनीने जारी केलेली आरएचपी आणि ०२ मे २०२४ रोजीची वैधानिक जाहिरात पाहावी. ही जाहिरात दि. ३ मे २०२४ रोजी फायनान्शिअल एक्सप्रेस (इंग्रजी राष्ट्रीय दैनिक) आणि जनसत्ता (हिंदी राष्ट्रीय दैनिक) या वृत्रपत्रांच्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झालेली आहे. हिंदी ही नवी दिल्लीची प्रादेशिक भाषादेखील आहे. याच ठिकाणी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे.
दि. ३१ डिसेंबर २०२३पर्यंतच्या आकडेवारीनुसार, टीबीओ प्लॅटफॉर्मद्वारे शंभराहून अधिक देशांतील १५९,००० खरेदीदारांना १० लाखांहून अधिक पुरवठादारांशी जोडले जाते. टीबीओमध्ये विविध देशांच्या चलनांमध्ये व्यवहार होतात, तसेच विदेशी चलनांच्या संदर्भात सहाय्यही पुरविले जाते. (स्रोत: 1लॅटिस रिपोर्ट).
हॉटेल्स, एअरलाइन्स, भाडेतत्त्वावरील कार, ट्रान्सफर्स, क्रूझ, विमा, रेल्वे आणि इतर (या सर्वांचा एकत्रितपणे उल्लेख सप्लायर्स असा करावा); ट्रॅव्हल एजन्सी व स्वतंत्र प्रवासी सल्लागार यांसारखे किरकोळ खरेदीदार (यांचा उल्लेख रिटेल बायर्स म्हणून करावा), तसेच टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल मॅनेजमेंट कंपन्या, ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्या, सुपर-ॲप्स व लॉयल्टी ॲप्स यांच्यासारखे एंटरप्राइझ खरेदीदार (यांचा उल्लेख रिटेल बायर्सच्या बरोबरीने बायर्स असा करावा) या सर्वांसाठी टीबीओतर्फे व्यवहार केले जातात. टीबीओच्या द्विपक्षीय तांत्रिक प्लॅटफॉर्मद्वारे पुरवठादार आणि खरेदीदारांना एकमेकांशी अखंडपणे व्यवहार करण्यास अनुमती दिली जाते. टीबीओच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध पुरवठादारांच्या मोठ्या संख्येला तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरील विविध स्तरावरील, जागतिक खरेदीदारांसाठी आपली इन्व्हेंटरी प्रदर्शित करण्याची, त्यांचे विपणन करण्याची आणि किंमत ठरविण्याची संधी मिळते. खरेदीदारांसाठी हा प्लॅटफॉर्म म्हणजे एकात्मिक, बहु-चलन आणि बहु-भाषिक स्वरुपाचे वन-स्टॉप सोल्यूशन आहे. या प्लॅटफॉर्ममधून हे खरेदीदार जगभरात सहली, कॉर्पोरेट आणि धार्मिक प्रवास करण्यासाठीची माहिती शोधतात व तिकिटे काढतात.
अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रा. लि., जेफरीज इंडिया प्रा. लि. आणि जेएम फायनान्शिअल लि. हे या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
या प्रेस रीलिजमध्ये ज्या विशिष्ट संज्ञांची व्याख्या नमूद केली नसेल, त्यांचा अर्थ आरएचपीमध्ये विहित केल्याप्रमाणे घ्यावा.
‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियम क्र. ३१मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, १९५७च्या नियम १९(२)(बी), सुधारित (“एससीआरआर”) नुसार ही ऑफर देण्यात येत आहे. ‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियमावली ६(२) नुसार, ही ऑफर ‘बुक बिल्डिंग’ प्रक्रियेद्वारे केली जात आहे. यामध्ये निव्वळ ऑफरच्या किमान ५० टक्के भाग हा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी” आणि त्यांच्यासाठीचा “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी लीड व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून ‘क्यूआयबी पोर्शन’च्या ६० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना विवेकाधीन आधारावर वाटप करू शकेल आणि त्यातील एक तृतियांश भाग हा केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल, हे यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना देण्यात येणाऱ्या किंमतींपेक्षा अधिक रकमेची बोली देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून सादर होणे अपेक्षित आहे. ‘आयपीओ’ला कमी प्रतिसाद मिळाला किंवा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना शेअर्सचे वाटप झाले नाही, तर उर्वरीत इक्विटी शेअर्स ‘नेट क्यूआयबी पोर्शन’मध्ये समाविष्ट केले जातील.
याशिवाय, ऑफर प्राईसच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची वैध बोली आल्यास, ‘नेट क्यूआयबी पोर्शन’चा ५ टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल आणि उर्वरित ‘नेट क्यूआयबी पोर्शन’ हा म्युच्युअल फंडांसह सर्व ‘क्यूआयबी बोलीदारां’साठी (अँकर इन्व्हेस्टर्सव्यतिरिक्त) प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल.
याशिवाय, या ऑफरमधील १५ टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स बिगर-संस्थागत बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असतील, उदा. (अ) ज्या अर्जदारांनी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा एक तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल, आणि (ब) ज्या १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा दोन तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल. या (अ) आणि (ब) या दोन्ही श्रेणींपैकी कोणत्याही श्रेणीत शिल्लक राहिलेले शेअर्स बिगर-संस्थागत बोलिदारांमधील इतर उप-श्रेणीसाठी काढून देण्यात येतील. मात्र याकरीता या बोली ऑफर किंमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याच्या असायला हव्यात. तसेच सेबी आयसीडीआरच्या नियमांनुसार, किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी ३५ टक्क्यांहून कमी शेअर्स उरणार नाहीत, हेही बघावे लागेल. यामध्येही ऑफर किमतीइतक्या वा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोली येणे अपेक्षित असेल.
‘द एम्प्लॉई रिझर्व्हेशन पोर्शन’च्या अंतर्गत शेअर्ससाठी अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांनी ऑफर किमतीच्या बरोबरीची किंवा त्याहून अधिक रकमेची वैध बोली लावल्यास, त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल.
सर्व बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे. आपल्या संबंधित एएसबीए खात्याचा तपशील आणि ‘आरआयबी यूपीआय मेकॅनिझम’ वापरत असल्यास ‘यूपीआय’चा आयडी त्यांना याकरीता द्यावा लागेल. त्यानुसार त्यांच्या संबंधित बोलीची रक्कम ‘सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकां’द्वारे (“एससीएसी”) किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे, संबंधित बोली रकमेच्या मर्यादेपर्यंत ब्लॉक केली जाईल. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना ‘एएसबीए’ प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.