गाथा नवनाथांची मालिकेत सोनाली पाटील साकारणार अक्काबाईचे पात्र

By: Editor_Manas

On: Saturday, May 4, 2024 3:24 AM

Google News
Follow Us

सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखविणारी ‘गाथा नवनाथांची’ ही पौराणिक मालिका लवकरच ९०० भागांचा टप्पा पार करणार आहे. यामध्ये आत्तापर्यंत नवनाथांपैकी सात नाथांचा अवतार, त्यांचा प्रवास आणि लीला हे सर्व दाखवण्यात आले आहे. सध्या नागनाथांचा  प्रवास व त्यांचे चमत्कार प्रेक्षक भक्तांना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एकीकडे नाथांचा नकारात्मक गोष्टींविरुद्ध लढा सुरू आहे तर एकीकडे नागनाथ आणि भर्तरीनाथ यांचावर होणारे संस्कार पाहायला  मिळताहेत. पण आता मालिकेत दिसणार आहे अक्काबाई ही नकारात्मक व्यक्तिरेखा. अक्काबाई ही नाथांविरोधात उभी राहणार असून नाथांच्या पुढील कार्यात ती अडथळा निर्माण करणार आहे. अक्काबाईच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनाली पाटील आता नव्या भूमिकेत येणार आहे. गाथा नवनाथांची मालिकेतून अक्काबाई हे पात्र ती साकारणार आहे. तिच्या अभिनयाच्या छटा प्रेक्षकांना या मालिकेतून नक्की अनुभवता येतील.

अक्काबाईच्या येण्याने नाथांच्या पुढील कार्यात मोठे अडथळे तयार होणार आहेत. अक्काबाई ही अघोरी स्त्री आहे. ती गावकऱ्यांना आपल्या बाजूला करून घेणार आहे आणि नाथांच्या विरुद्ध कट रचणार आहे. त्यामुळे नाथांच्या कार्यात नक्कीच अडथळे तयार होतील. नाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणे आणि नाथ परंपरा कायम ठेवणे हे आहे. पण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतील. नाथ तिला कसे सामोरे जाणार, हे प्रेक्षकांना आता मालिकेत नक्कीच पाहायला मिळेल.  पाहायला विसरू नका, ‘गाथा नवनाथांची’ सोम. ते शनि. संध्याकाळी ६.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 23, 2026

August 22, 2026