पुणे : आता टाटा प्ले बिंजवर उपलब्ध असलेल्या डिस्कव्हरी+ वरील अद्वितीय कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घ्या. नव्याने सुरु करण्यात आलेली ही सुविधा प्लॅटफॉर्म टाटा प्ले बिंजला ओटीटी अॅप्सचा सर्वात मोठा समूह बनवतो, जेथे एकाच ठिकाणी ३० हून अधिक स्वदेशी व जागतिक अॅप्स उपलब्ध आहेत. ४० हून अधिक शैलींमधील ८५०० तासांहून अधिक कन्टेन्टची लायब्ररी असलेले डिस्कव्हरी+ अनेक आवड व पसंतींची पूर्तता करणाऱ्या कन्टेन्टची व्यापक श्रेणी देते. निसर्ग, विज्ञान, इतिहास व एक्स्प्लोरेशनचा आनंद देणारे लक्षवेधक माहितीपट, विविध संस्कृती व जीवनशैलींबाबत अद्वितीय माहिती देणारे सर्वोत्तम रिअॅलिटी शोज आणि भारताबाबत लक्षवेधक कथानक सांगणाऱ्या ओरिजिनल सिरीजसह डिस्कव्हरी+ विशिष्ट कन्टेन्टचा खजिना आहे.
टाटा प्लेच्या चीफ कमर्शियल अँड कन्टेन्ट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या की ”टाटा प्ले बिंजमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या सुविधेत समाविष्ट असलेले डिस्कव्हरी+ आमच्या कन्टेन्ट ऑफरिंग्जमध्ये वाढ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. सहयोगींची व्यापक श्रेणी विविध शैलींमधील कलेक्शन दाखवण्यासोबत विविध स्थानिक भाषांमधील मनोरंजनाची खात्री देखील देते. या सहयोगासह लक्षवेधक कथानकांची श्रेणी पाहायला मिळेल, जेथे प्रेक्षकांना एकाच ठिकाणी डिस्कव्हरी+ ने प्रदान केलेल्या सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद मिळेल”.
वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीचे दक्षिण आशियामधील डिस्ट्रिब्युशन अँड युरोस्पोर्टचे प्रमुख रूचीर जैन म्हणाले, ”आम्हाला टाटा प्ले बिंजसोबतच्या आमच्या सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा सहयोग भारतातील त्यांच्या सबस्क्रायबर्सना डिस्कव्हरी+ कन्टेन्ट विनासायास उपलब्ध करून देईल. विशेष माहितीपट, लक्षवेधक सिरीज आणि सर्वसमावेशक ओरिजिनल्सची आमची व्यापक लायब्ररी, तसेच प्रतिष्ठित टायटल्स जसे ‘सिक्रेट्स ऑफ द बुद्ध रिलिक्स’, ‘हिस्ट्री हंटर’ आणि ‘स्टार व्हर्सेस फूड: सर्व्हायवल’ यांसह आम्ही भारतातील प्रेक्षकांना अद्वितीय मनोरंजन अनुभव देण्याप्रती समर्पित आहोत. आता, टाटा प्ले बिंजचे ग्राहक त्यांच्या आवडत्या डिवाईसेसवर डिस्कव्हरी+ कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.”
प्रेक्षकांसाठी नवीन आऊटलुक सादर करत डिस्कव्हरी+ वन्यजीवन, साहस, विज्ञान, फूड, इतिहास, पौराणिक, जीवनशैली व ऑटो यामधील शोजच्या वैविध्यपूर्ण श्रेणीसाठी ओळखले जाते. फक्त एवढेच नाही भारतातील प्रेक्षकांसाठी प्लॅटफॉर्म आतापर्यंत विसरलेल्या, दुर्लक्षित किंवा पूर्वी अज्ञात असलेल्या भारतीय कथानकांच्या व्यापक श्रेणीसाठी पसंतीचे गंतव्य आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये काही लोकप्रिय टायटल्सचा समावेश आहे, जसे ९० डे फियान्स, मॅन व्हर्सेस वाइल्ड व टॉप गिअर, #इंडियामायवे, ब्ल्यू प्लॅनेट, सिक्रेट्स ऑफ द कोहीनूर, इंडियाज अल्टिमेट वॉरियर आणि इतर अनेक. डिस्कव्हरी+ चा टाटा प्ले बिंजवरील इतर लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये समावेश होईल, जसे अॅप्पल टीव्ही+, डिस्नी+ हॉटस्टार, झी ५, लायन्सगेट प्ले, फॅनकोड, सन एनएक्सटी, अहा, फ्यूज+, हॉलमार्क मूव्हीज नाऊ, पीटीसी प्ले, अॅनिमॅक्स, व्रॉट, स्टेज, रीलड्रामा, चौपाल, नमा फ्लिक्स, प्लॅनेट मराठी, मॅनोरमामॅक्स, आयस्ट्रीम, तरंग प्लस, हंगामा प्ले, शेमारूमी, क्यूरिओसिटी स्ट्रीम, एपिक ऑन, ट्रॅव्हलएक्सपी, डॉक्यूबे, शॉर्टसटीव्ही, प्लेफ्लिक्स, क्लिक , डिस्ट्रो टीव्ही, एमएक्स प्लेअर, तसेच गेमिंग. या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील कन्टेन्ट एकाच सबस्क्रिप्शन आणि एकाच युजर इंटरफेसच्या माध्यमातून टाटा प्ले बिंजच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.
तसेच, नेटफ्लिक्सचा सर्व टाटा प्ले डीटीएच सबस्क्रायबरसाठी डीटीएच चॅनेल्ससोबत कॉम्बो पॅक म्हणून आनंद घेता येऊ शकतो. डीटीएच कनेक्शन असलेल्या सर्व टाटा प्ले बिंज सबस्क्रायर्सना अॅड-ऑन म्हणून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ कन्टेन्ट उपलब्ध होऊ शकतो. प्रेक्षक स्मार्टफोन्स, एलजी, सॅमसंग व अँड्रॉईड स्मार्ट टेलिव्हिजन्सच्या माध्यमातून मोठ्या स्क्रिनचे कनेक्टेड डिवाईसेस, डेस्कटॉप, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स, अॅमेझॉन फायरटीव्ही स्टिकचे टाटा प्ले एडिशन आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट टाटाप्ले बिंज डॉट कॉमवर सर्व ३० हून अधिक अॅप्सचा आनंद घेऊ शकतात.