भारतातील सर्वात मोठे घड्याळ रिटेल नेटवर्क, टायटन वर्ल्डने मदर्स डेच्या निमित्ताने थेट हृदयाला गवसणी घालेल असे विशेष कॅम्पेन सुरु केले आहे. तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची महिला – तुमच्या आईसोबत वेळ व्यतीत करण्याची महती सांगणारे अतिशय अनोखे असे हे कॅम्पेन आहे. आई आणि तिच्या मुलामधील सखोल नात्याभोवती हे कॅम्पेन गुंफण्यात आले आहे. टायटन वर्ल्ड स्टोरमध्ये आईसाठी शानदार सरप्राईजने या कॅम्पेनची सांगता होते. कुटुंबाचे पोषण आणि देखभाल करण्यासाठी, पूर्णपणे निस्वार्थपणे आपला संपूर्ण वेळ देणाऱ्या आईप्रती कौतुक आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून तिच्यासोबत व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाचे मूल्य या फिल्ममध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
यंदाच्या मदर्स डेला टायटन वर्ल्ड आपल्या ग्राहकांना आईसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याची संधी आपल्या ग्राहकांना उपलब्ध करवून देत आहे. स्टोरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरप्राईजसह ग्राहक आनंद सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. निवडक टायटन वर्ल्ड स्टोर्सना खास सजवण्यात येईल, केक, फुले अशी आकर्षक सजावट करून टायटन वर्ल्ड स्टोरमध्ये विशेष आपुलकी व आनंदाचे वातावरण निर्माण केले जाईल. इतकेच नव्हे तर, याठिकाणी ग्राहक एका खास हॅन्ड-पेंटींग ऍक्टिव्हिटीमध्ये देखील भाग घेऊ शकतील, हे चित्र फ्रेम करून अनोख्या नात्याचे प्रतीक म्हणून कायमचे जवळ ठेवता येईल. खऱ्या अर्थाने संस्मरणीय सोहळा साजरा करण्यासाठी हा अनुभव डिझाईन करण्यात आला आहे, त्यामुळे आई आणि मुलांना याठिकाणी येऊन आपला आनंद अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करता येईल.
टायटन वॉचेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि चीफ सेल्स व मार्केटिंग ऑफिसर श्री राहुल शुक्ला यांनी सांगितले, “सध्याचा काळ इच्छा तात्काळ पूर्ण करून समाधान मिळवण्याचा काळ आहे. टायटन वर्ल्डमध्ये आम्ही असे कॅम्पेन सुरु करत आहोत ज्यामध्ये आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी स्वतःचा संपूर्ण वेळ देणाऱ्या महिलेसोबत उत्तम वेळ व्यतीत करण्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यासाठी आम्ही आमच्या स्टोर्समध्ये अतिशय अनोखा अनुभव निर्माण करत आहोत, याचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःच्या आईसोबत अविस्मरणीय क्षण निर्माण करू शकाल. या आनंद सोहळ्याचा शिरोमणी म्हणून तुम्ही टायटनमध्ये उपलब्ध असलेल्या, विविध स्टाईल्स व व्यक्तिमत्त्वांना साजेशा पर्यायांमधून तुमची मनाजोगती खरेदी देखील करू शकाल.”
चेंबूर, इन्फिनिटी मालाड, डोंबिवली, एसजीसी मॉल – सीवूड्स मॉल, कल्याण, पनवेल, बोरिवली, सेक्टर १७ वाशी, मुलुंड, कोरम मॉल, नौपाडा, ओबेरॉय मॉल गोरेगाव, विवियाना मॉल, नवी मुंबई वाशी सेक्टर १७, ऑफ लिंक रोड अंधेरी, ठाणे हिरानंदानी मेडोज, बांद्रा या स्टोर्समध्ये ग्राहकांना विशेष सोहळ्याचा आनंद घेता येईल. आम्हाला mothersday@titan.co.in वर ईमेल करा, टायटन वर्ल्डसोबत खऱ्या अर्थाने खास सेलिब्रेशनची आखणी करा व यंदाचा मदर्स डे अविस्मरणीय बनवा.
कॅम्पेन फिल्म पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
About Titan World:
Being India’s most extensive retail watch network, Titan World graces over 600 locations in 225+ cities in India. We bring you a broad array of timepieces ranging from our in-house brands like Titan, Titan Smart, Raga, Xylys, Nebula, Sonata, Fastrack, Fastrack Smart and Zoop to celebrated international labels such as Tommy Hilfiger, Kenneth Cole, Anne Klein and Police. Titan World is a diverse lifestyle destination offering an exquisite collection of perfumes, wallets, clocks and hearables. We are a platform where style, innovation, and choice meet, ensuring there’s something for everyone. Each piece is a testament to thoughtful design, meticulous attention to detail, and our commitment to redefine fashion narratives.
From chic classics for an elegant evening, sporty chronographs for the thrill-seekers, to trendy watches making a style statement, we have the perfect match for every personality. The wide range of timepieces ranges from 1500 to 150000.