पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकसेना पार्टी चे अधिकृत उमेदवार, ओबीसी बहुजन पार्टी चे पुरस्कृत उमेदवार असलम इसाक बागवान यांनी सायकलवरून आणि पदयात्रेद्वारे थेट मतदारांशी संवाद साधत प्रचार केला.हडपसर,कोंढवा पाठोपाठ सर्व मतदारसंघात त्यांनी प्रचार केला.त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी दिवसभर विविध भागात त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करून बागवान यांना विजयी करण्याचे आवाहन केले.महिलांचा लक्षणीय सहभाग या प्रचारकार्यात होता.’लोकसभा निवडणुकीनंतर देखील आपण लोकांच्या सेवेत उपलब्ध राहू’असे आश्वासन बागवान यांनी केले.
या प्रचाराचे वैशिष्ट्य म्हणजे सायकलला भोंगा लावून सायकल वरून अगदी अल्पखर्चात लोकशाहीला अभिप्रेत असलेली मूल्ये मतदारांपर्यंत पोहचविण्या करीता ,जनतेचे प्रश्न जमिनी स्तरावर स्वतः समजून घेण्याकरीता प्रयत्न केला गेला.असलम इसाक बागवान यांनी आपल्या प्रचाराची सुरूवात हडपसर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र दिनी केली होती.