अवैध रित्या गांजा जवळ बाळगाऱ्या आरोपीस आळेफाटा पोलीसांनी छापा टाकून ताब्यात घेत ५,३५,९५०/- रू किंमतीचा गांजा केला जप्त केला.
आळेफाटा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुरेश मनोहर केदारी वय ३५ वर्षे रा. बोरी ठाकरवाडी ता. जुन्नर हा त्याचे राहत्या घरात अवैधरित्या गांजा जवळ बाळगून त्याची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असल्याची खात्री लायक बातमी मिळाली असल्याने त्यांनी लगेच सदरबाबत पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांना माहिती दिली.
त्यानंतर सतिश होडगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची सदरची कारवाई करणेकामी लेखी परवानगी घेवून सुरेश मनोहर केदारी याच्या राहत्या घरी पंचासह छापा टाकून घराची घरझडती घेतली असता.
त्याच्या घरामध्ये ५,३५,९५०/- रू किंमतीचा १७ किलो ८६५ ग्रॅम गांजा मिळून आल्याने आरोपी सुरेश मनोहर केदारी याच्या विरूध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणी मनोव्यपारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (C), २० (B) (ii) (b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. तसेच मा. न्यायालयाचे आदेशान्वये आरोपी हा न्यायालयीन कस्टडी मध्ये आहे.
कामगिरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे ,उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर , सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो. कॉ. अमित माळुंजे, पो. कॉ नविन अरगडे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.