सावसोल लुब्रिकंट्सने बॉलीवूडचा युवा आयकॉन सिद्धार्थ मल्होत्राची प्रमुख ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ब्रँड रिव्हॅम्पमध्ये केली घोषणा

National, 17 एप्रिल 2024 : सावसोल लुब्रिकंट्स ही ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रियल लूब्रिकंट्समधील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने आज अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सावसोल इस्टर ५ ही एक अग्रणी लूब्रिकंट श्रेणी लॉन्च करण्याची घोषणा केली. ही नवीन श्रेणी या प्रकारच्या श्रेणीत आणि लूब्रिकंट्स बाजारपेठेत परिवर्तन घडवून आणेल.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासोबतच सावसोल लुब्रिकंट्सने बॉलीवूडचा युवा आयकॉन सिद्धार्थ मल्होत्रा ​​याला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साइन केल्याची घोषणाही करण्यात आली. या धोरणात्मक वाटचालीसह कंपनीची ब्रँड दृश्यमानता आणि पोहोच वाढवणे आणि ग्राहकांसोबत मजबूत बंध निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. सावसोल इस्टर ५ या नावाखाली उत्पादनांची सर्वात प्रगत श्रेणी सादर करण्याच्या सावसोलच्या प्रवासात सिद्धार्थसोबतची भागीदारी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

सविता ऑइल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम एन. मेहरा म्हणाले, “आम्हाला लुब्रिकंट्स उद्योगात नवीन बेंचमार्क प्रस्थापित करणाऱ्या इस्टर उत्पादनांच्या श्रेणीसह आमच्या पाथ-ब्रेकिंग एस्टर फ्लुइड तंत्रज्ञानाचे अनावरण करताना आनंदित आहोत. सिद्धार्थ मल्होत्रा ​​सह, आम्ही उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यासाठी तयार आहोत. आणि त्यासाठी आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने आणि अनुभव प्रदान करणे हे कायमच सुरू राहील.”

“आमची नावीन्यपूर्णतेची वचनबद्धता आम्हाला सतत आकांक्षांचे क्षितिज वाढवण्यास आणि उद्योग मानके पुन्हा परिभाषित करण्यास भाग पाडते. सावसोल इस्टर 5 ही इस्टर असलेली क्रांतिकारी लुब्रिकंट्स तंत्रज्ञान असलेली एक श्रेणी आहे जी आमच्या ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी सर्वोत्तम उत्पादने देण्याच्या आमच्या समर्पणाला अधोरेखित करते. अनेक वर्षांच्या संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांनंतर, रोजच्या प्रवाशांसाठी ऑप्टिमाइझ केलेल्या उत्पादन श्रेणीमध्ये हे प्रगत लुब्रिकंट प्रदान करण्यात सक्षम झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे सविता ऑइल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक सिद्धार्थ जी. मेहरा म्हणाले.

ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्तीबद्दल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, “मला सावसोल लुब्रिकंट्ससोबत भागीदारी करताना आणि ग्राहकांना एक विशिष्ट ऑटोमोटिव्ह ड्रायव्हिंग अनुभव देण्याच्या वचनबद्धतेला पुढे नेताना आनंद होत आहे. माझ्या उत्कृष्टतेच्या शोधात सावसोलसारख्या नाविन्यपूर्ण ब्रँडसोबतचे सहकार्य लाभत आहे आणि त्यामुळे हा प्रवास एकत्र करण्यास मी उत्सुक आहे.”

प्रख्यात अभिनेत्यासोबतची ही भागीदारी, नवकल्पना आणि तंत्रज्ञानामध्ये रुजलेल्या सावसोलच्या भविष्यवेधी विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. ​​ब्रँड ॲम्बेसेडर सिद्धार्थ मल्होत्रासह सवसोलचे लक्ष्य हे अधिक व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे.  तसेच अत्याधुनिक लुब्रिकंट आणि सेवांसाठी पसंतीची निवड म्हणून त्याची प्रतिष्ठा मजबूत करणे हेही कंपनीचे उद्दिष्ट आहे.