रत्नागिरी, १९ एप्रिल २०२४ – एचएमएसआयसाठी रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. रस्त्यावर जबाबदारीने वावरायची सवय रूजवण्यासाठी आणि सुरक्षेला महत्त्व देणारा समाज तयार करण्यासाठी कंपनीद्वारे देशाच्या वेगवेगळ्या भागात रोड सेफ्टी अवेयरनेस कॅम्पेन्सचे आयोजन केले जाते. अशाप्रकारची कॅम्पेन्स नागरिकांना सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्यांच्यामध्ये सजगता निर्माण करतात असे एचएमएसआयला वाटते.
अशाप्रकारच्या विविध उपक्रमांपैकी एक कॅम्पेन नुकतेच रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आले होते. या कॅम्पेनने सहभागींवर कायमस्वरूपी ठसा उमटवला. लहान मुलांना शिक्षित करण्यावर एचएमएसआयने लक्ष केंद्रित केले असून आयक्यूआरए इंग्लिश मीडियम स्कूल आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात झालेल्या या कॅम्पेनमध्ये 1500 शालेय विद्यार्थी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
लहान वयात रस्त्यावरील सुरक्षेविषयी जागरूक करणे महत्त्वाचे आहे असे एचएमएसआयला वाटते आणि म्हणूनच त्यांनी शालेय तसेच कॉलेज पातळीवर रस्त्यावरील सुरक्षेविषयी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. लहान वयात नवीन माहिती शिकण्यास आपलं मन उत्सुक असतं, हे लक्षात घेत कंपनीने भावी पिढीला रस्त्यावरून मार्ग काढण्यासाठी आवश्क ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करण्याचे ठरवले आहे. रोड सेफ्टी अवेयरनेस कॅम्पेनमध्ये रोड सेफ्टी गेम्स, सेफ रोड थिअरी सेशन, रस्त्यावरील चिन्हे आणि रायडिंग पोश्चरचे प्रशिक्षण अशा संवादी उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
स्थापनेपासून एचएमएसआयने महाराष्ट्रात ५ लाख प्रौढ आणि मुलांना रस्त्याचा जबाबदारीने वापर कसा करावा तसेच सुरक्षितपणे वाहन कसे चालवावे याचे शिक्षण दिले आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची रस्ते सुरक्षाप्रती सीएसआर बांधिलकी
२०२१ मध्ये जाहीर करण्यात आल्याप्रमाणे ‘होंडाने २०५० पर्यंत जागतिक पातळीवर होंडा मोटरसायकल्स आणि वाहनांचा समावेश असलेले अपघात शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवले आहे. भारतात एचएमएसआय या ध्येयाच्या दिशेने सरकारच्या मदतीने काम करत असून हे ध्येय साध्य करण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, २०३० पर्यंत मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणायचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी
आपल्या मुलांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी सकारात्मक मानसिकता रूजवणे आणि त्यानंतरही त्यांना शिक्षण देत राहाणे आवश्यक आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी दिले जाणारे शिक्षण जागरूकता निर्माण करते व त्याचबरोबर मुलांमध्ये सुरक्षा संस्कृती रूजवत त्यांना सुरक्षा दूत बनवण्याचे काम करत आहे. यामुळे पुढच्या पिढया जास्त जबाबदार होण्यास मदत होईल व ते अधिक सुरक्षित समाजासाठी लक्षणीय योगदान देतील.
समाजाला हवीशी वाटणारी कंपनी बनण्याचे एचएमएसआयचे ध्येय आहे आणि समाजातील सर्व थरांमध्ये रस्त्यावरील सुरक्षेविषयी जागरूकता पसरवण्यासाठी कंपनी नेटाने झटत आहे.
एचएमएसआयच्या कुशल सेफ्टी इन्स्ट्रक्टर्सची टीम भारतभरात आमचे १० दत्तक ट्रॅफिक ट्रेनिंग पार्क्स (टीटीपी) आणि ६ सेफ्टी ड्रायव्हिंग एज्युकेशन सेंटर्समध्ये (एसडीईसी) रोज हे उपक्रम राबवत समाजातील प्रत्येक विभागासाठी रस्ते सुरक्षा शिक्षण सहजपणे उपलब्ध करून दिले जाता. आतापर्यंत ५.७ दशलक्ष भारतीयांपर्यंत हे उपक्रम पोहोचले आहेत. एचएमएसआयच्या नॅशनल सेफ्टी अवेयरनेस प्रोग्रॅमने हे शिक्षण मजेदार तरीही शैक्षणिक केले आहे –
वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेले लर्निंग मोड्युल – होंडाच्या कुशल मार्गदर्शकांनी रस्त्यावरील चिन्हे आणि खुणा, रस्त्यावरील चालकाचे कर्तव्य, रायडिंग गियर आणि स्थिती आणि सुरक्षितपणे गाडी चालवण्याचे तंत्र यांवर थिअरी सत्र तयार केले आहे.
- प्रत्यक्ष शिक्षण: होंडाच्या व्हर्च्युअल रायडिंग स्टिम्युलेटरवर खास प्रशिक्षण देत सहभागींना प्रत्यक्ष गाडी चालवण्यापूर्वी रस्त्यावरच्या संभाव्य १०० धोक्यांचा अनुभव देण्यात आला.
- संवादी सत्र: सहभागींना किकेन योसोकु ट्रेनिंग (केवायटी) हे धोक्याचा अंदाज लावण्याचे तंत्र शिकवण्यात आले,ज्यामुळे धोक्याविषयी रायडर/चालकाची धोका ओळखण्याची क्षमता तीव्र होते व रस्त्यावरील वाहन चालवताना सुरक्षेला प्राधान्य दिले जाते.
- सद्य चालकांसाठी रायडिंग कौशल्य विकास– आधीपासून वाहन चालवत असलेले विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी यांना स्लो रायडिंग उपक्रम व अरूंद फळ्यांवर वाहन चालवत प्रशिक्षण देण्यात आले.
- मजेदार पद्धतीने शिक्षण:रस्त्यावरील सुरक्षेची माहिती कायम लक्षात राहावी यासाठी होंडाने रोड सेफ्टी गेम्स आणि प्रश्नमंजुषांचे आयोजन केले.