पुणे, एप्रिल, २०२४: नाइट फ्रँक इंडियाने त्यांचा नवीन अहवाल भारतीय रिअल इस्टेट: निवासी व ऑफिस क्यू१ २०२४ (जानेवारी ते मार्च २०२४) मध्ये नमूद केले की, देशातील प्रमुख आठ शहरांपैकी पुणे शहरामध्ये जवळपास ३० टक्के फ्लेक्स कार्यालयीन व्यवहार झाले. २०२४ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान पुणे शहराने १.२ दशलक्ष चौरस फूट जागेसह देशामध्ये फ्लेक्स जागा भाड्याने देण्याच्या सर्वाधिक प्रमाणाची नोंद केली आहे. पुयातील फ्लेक्स कार्यालयीन जागेसाठी व्यवहार २०२३ च्या पहिल्या तिमाहीमध्ये वार्षिक ३०० टक्क्यांच्या वाढीसह ०.३ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत पोहोचले.
ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि इंडिया फेसिंग बिझनेसेसनी प्रत्येकी ०.३ दशलक्ष चौरस फूट जागेचे व्यवहार केले. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कोणतेही व्यवहार न केलेल्या थर्ड-पार्टी आयटी सेवांनी आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ०.२ दशलक्ष चौरस फूट जागेच्या व्यवहाराची नोंद केली.
२०२४ च्या पहिल्या तिमाहीत पुणे शहराने १.९ दशलक्ष चौरस फूट जागेच्या व्यवहारांची नोंद केली. विकासासंदर्भात पुणे शहराने देशातील आठ बाजारपेठांमध्ये दुसरे स्थान मिळवले, जेथे शहराने आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक १४६ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. शहरातील कार्यालयीन जागा पूर्ण होण्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीमधील ०.६ दशलक्ष चौरस फूटांवरून आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये १८३ टक्क्यांच्या वाढीसह १.८ दशलक्ष चौरस फूटांपर्यंत पोहोचले. शहरातील भाडेदरामध्ये वार्षिक ४ टक्क्यांची वाढ झाली, ज्यामुळे भाडेदर प्रतिमहिना प्रति चौरस फूट ७५ रूपयांपर्यंत वाढले.
पुणे शहरामध्ये वार्षिक १४ टक्क्यांच्या वाढीसह एकूण ११,८३२ निवासी सदनिकांची विक्री झाली, तर वार्षिक १५ टक्क्यांच्या वाढीसह याच कालावधीदरम्यान १३,२९३ सदनिका लाँच करण्यात आल्या. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान सरासरी भारित निवासी किमतीमध्ये वार्षिक ४ टक्क्यांची वाढ झाली, ज्यामुळे किंमत प्रति चौरस फूट ४,५५२ रूपयांपर्यंत पोहाचेली.
२०२४ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान पुणे शहरातील १० दशलक्ष रूपये व त्यापेक्षा अधिक तिकिट आकाराच्या श्रेणीमधील सदनिकांची विक्री देशातील आठ प्रमुख शहरांच्या तुलनेत दुसरी सर्वात मोठी वार्षिक वाढ ठरली, जेथे विक्री २०२३ च्या पहिल्या तिमाहीमधील १,०३८ सदनिकांच्या तुलनेत १२० टक्क्यांच्या वाढीसह २०२४ च्या पहिल्या तिमाहीत २,२७६ सदनिकांपर्यंत पोहोचली. शहरातील ४६ टक्के विक्री ५ दशलक्ष ते १० दशलक्ष रूपये विभागातील होती. ५ दशलक्ष रूपयांखालील तिकिट आकाराचा हिस्सा ३५ टक्के होता, तर १० दशलक्षरूपयांवरील तिकिट आकाराचा हिस्सा १९ टक्के होता.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजाल म्हणाले, ”कार्यालयीन व निवासी क्षेत्रांमधील प्रबळ कामगिरींमुळे रिअल इस्टेट बाजारपेठेत अपवादात्मक बदल दिसण्यात आला. विशेषत: निवासी विभागात मोठा बदल दिसण्यात आला, जेथे १ कोटी रूपये व त्यापेक्षा अधिक उच्च किमतीच्या श्रेणीमधील विक्रीमध्ये वाढ कायम राहिली. यामधून होत असलेली प्रबळ मागणी दिसून येण्यासोबत ग्राहकांचा दीर्घकालीन गुंतवणूक करण्यामधील विश्वास देखील दिसून येतो. त्याचप्रमाणे, कार्यालयीन क्षेत्राने विकासगती कायम राखली, जेथे आतापर्यंत तिमाहीमधील सर्वात्तम कामगिरीची नोंद केली. देशातील आर्थिक स्थिरतेने भारतात कार्यरत असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कार्यसंचालनांमध्ये वाढ करण्यास प्रेरित केले आहे, जसेच कार्यालयीन क्षेत्रांसाठी मागणी वाढत आहे. याव्यतिरिक्त, अनेक कंपन्या आता समकालीन कार्यालयीन सेटअप्समध्ये सुधारणा करत आहेत, त्यांचे वर्क-फ्रॉम-होम धोरण कमी किंवा बंद करत आहेत, ज्यामुळे मागणीला अधिक गती मिळत आहे. आम्हाला स्थिर आर्थिक धोरणे आणि देशांतर्गत लाभदायी स्थितींमुळे भविष्यात या क्रियाकलापांची गती प्रबळ राहण्याची अपेक्षा आहे.