Pune Crime News : पैसे देण्यास नकार दिल्यावरून हॉटेलचालकावर चालवली गोळी, पुण्यात तीन दिवसांत तिसरा गोळीबार

Pune Crime News : पैसे देण्यास नकार दिल्यावरून हॉटेलचालकावर चालवली गोळी, पुण्यात तीन दिवसांत तिसरा गोळीबार

पुणे : पैसे देण्यास नकार दिल्यावरून एका हॉटेलचालकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. यामध्ये विकी राजू चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर, येरवडा) जखमी झाला. शहरात तीन दिवसांत गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. जंगली महाराज रस्त्यावरील अन्य एका घटनेत पिस्तुलातून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…

या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आकाश सतीश चंडालिया, अक्षय सतीश चंडालिया, अमन सतीश चंडालिया, अभिषेक श्याम चंडालिया (सर्वजण रा. रेंजहिल्स, पुणे), सुशांत प्रकाश कांबळे (रा. पर्णकुटी सोसायटी, येरवडा), संदेश संतोष जाधव आणि संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तारू अद्याप फरार असून उर्वरित पाच जणांना अटक केली आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत आकाश जखमी झाला. आरोपींविरुद्ध पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत.

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रसेन हायस्कूलसमोरील व्ही. आर. ४ यू हॉटेलमध्ये गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सराईत गुन्हेगार आले. त्यांनी हॉटेलचालक विकी याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी विकीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आकाशने ‘आज तुझा गेमच करतो’ असे म्हणत पिस्तुलातून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबार करून आरोपी पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर फरार झालेल्यांपैकी पाच आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे (गुन्हे) करत आहेत.