पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?

मुंबईसह राज्यातील सर्वच शहरात वडापाव हे फेमस फास्ट फुड आहे. झटपट तयार होणारा, खाण्यासाठी कमी वेळ लागणारा तरीही अतिशय लज्जतदार असा हा पदार्थ आहे.

शहरातील अनेक वडापाव स्टॉल चांगलेच फेमस आहेत. या स्टॉलवर नेहमी गर्दी असते. पुण्यातील कोथरुडमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काका वडेवाल्यांचा स्टॉल फेमस असून येथील वडापाव खाण्यासाठी चक्क रांग लागलेली असते.

Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली

कोथरुड परिसरातील शिवतीर्थ नगर आणि गुजरात कॉलनी या परिसरात नामदेव कुंभार यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला. आता वडिलांच्या वयामुळे नामदेव आणि त्याचा भाऊ हा व्यवसाय सांभाळतात.गेल्या 30 वर्षापासून आजतागायत आमच्या वडापावची चव आबादीत आहे. त्यामुळे आवर्जून लोक इथे वडापाव खायला येतात.आमच्याकडं वडापाव खाण्यासाठी ग्राहक रांगेत उभे असतात, अशी माहिती नामदेव कुंभार यांनी दिली.

ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार

वडयाचा एक घाणा काढला की तो चक्क पाच ते दहा मिनिटांमध्ये कमीत कमी 40 ते 50 वडे आमचे लगेचच संपतात. आमच्या वड्याची खासीयत तशी आहे की आमच्या वड्यांमध्ये सुरुवातीला थोडासा गोडसर लागणारा वडा हळू तिखट लागत जातो. आणि त्याच्या कुरकुरीतपणामुळे हा वडापाव अतिशय टेस्टी असतो, असे कुंभार यांनी स्पष्ट केलं.

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…

हा वडापाव पॉकेट फ्रेंडली असून 15 रुपयांना मिळतो. त्यामुळे कॉलेजच्या तरुणांची इथं मोठी गर्दी असते.सोमवार ते शनिवार दुपारी एक ते रात्री साडेनऊपर्यंत काका वडेवाले यांचा स्टॉल सुरू असतो. रविवारी त्यांना सुटी असते.

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे