हुतात्मा सैनिकांच्या पत्नींचा सन्मान

पुणे : ध्रुव आय टी कंपनी, फोर  पोल्स इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी  यांच्या संयुक्त विद्यमाने  आणि शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशन च्या सहकार्याने एकूण १८  हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना (वीरनारीना कायनेटिक झुलू इ बाईक‘ भेट देऊन त्यांच्या कुटुंबाच्या योगदानाचा  सन्मान करण्यात आला. 
 
 सेनापती बापट रस्त्यावरील ‘इंद्रप्रस्थ येथे झालेल्या एका कार्यक्रमात  नुकतीच ही भेट देऊन सन्मान करण्यात आला. ध्रुव कंपनीचे सहसंस्थापक आणि सी.डी.. मिलिंद बोराटे,फोर पोल्स  इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे अंकुश मल्होत्रा,सौरभ खन्ना यांचे  सहकार्य या उपक्रमाला लाभले.हा अभिनव उपक्रम  वीरनारीपर्यंत पोहोचण्याचे  काम  शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फौंडेशनच्या अध्यक्ष गीता गोडबोले यांनी  केले.सुवर्णा गोडबोले, वैशाली गोळे, सुवर्णा पाटील, प्रतिभा खटके, हर्षदा खैरनार, सोनाली फराटे, अरुणा तारके, विद्या सानप, नीलम शिळीमकर, रेखा खैरनार, उमा गोसावी, दीपाली मोरे, शीतल जगदाळे, मीनाक्षी भिसे, सुस्मिता पालेकर, सुमन पाटील, भारती पिलावरे आणि सुनंदा ठिगळे या वीरनारीना इ बाईक भेट मिळाली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन  मानसी चौधरी यांनी केले.ध्रुव कंपनीचे  रतनदीप यांनी आभार मानले.
ध्रुव कंपनीच्या  मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष   रतनदीप म्हणाले,’मी  शॉर्ट सर्व्हिसमधून पाच वर्ष सैन्यामध्ये सेवा केलेली आहे. त्यामुळे एका जवानाचे  योगदान किती मोठे  आहे याची   जाणीव आहे. आपण या निमित्ताने हुतात्मा सैनिकांच्या  कुटुंबियांसाठी चांगले काम करू शकलो याचाच खूप आनंद आहे