पुर्व हवेलीतील दूध विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांना गंडा; ५६ रूपयांची दुध पिशवी मिळतेय ५८ रूपयांना; पाण्याचे एक बाटली २९ रूपयांना

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील अनेक गावात दूध विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांकडून ग्राहकांची लूट होत असून याला कोण वाली आहे का? अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.

प्रेक्षकांनो थिएटरमधला हा नियम बदलला; पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?

कदमवाकवस्ती, लोणी काळभोर इत्यादी मोठ्या गावात गायीच्या सील बंद दुधाच्या पिशवीची किंमत ५६ रुपये लिटर असताना दूध विक्रेते ५८ रुपये घेत असुन म्हशीच्या दुधाची किंमत ७२ रुपये असताना काही किराणा दुकानदार ७४ रुपये घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मोठी बातमी : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत मोठी अपडेट

हॉटेल व्यवसाय पाण्याच्या बाटलीची किंमत त्यांच्या मर्जीप्रमाणे घेत असून १५ रुपयापासून ते २९ रुपयापर्यंत या बाटलीची किंमत घेत आहेत. तसेच बाटलीवर कसल्याही प्रकारची किमंत नसल्याने ग्राहकाला आश्चर्य वाटले आहे.

BJP : पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ; निष्ठावंतांचे मुंबईमध्ये राजीनामे

याबाबत लोणी काळभोर येथे एका ग्राहकाने गाईचे सील बंद अर्धा लिटरच्या दोन पिशव्या म्हणजे एक लिटर दुध आणले असता दुकानदाराने त्याच्या कडून ५८रुपये घेतले त्यावर २८ रुपये अर्धा लिटर असे असताना त्या दुकानदाराने ग्राहकाकडून ५८रुपये घेतले असून सर्व करा सहित ५६ रुपये घेणे बंधनकारक आहे.

Crime News : दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल

परंतु दुकानदार ग्राहकांची लुट करत असून त्याविरुद्ध अखिल भारतीय ग्राहक पंचायत लवकरच अशा दुकानदारांना कायदेशीर मार्गाने धडा शिकविणार असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप शिवरकर यांनी सांगितले.

तरुणीला कुरियरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून फसविले तर ४० वर्षीय व्यक्तीची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; पुण्यात नेमकं चाललंय काय?

ते पुढे म्हणाले ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कुठलीही वस्तू एम.आर.पी पेक्षा एक रुपया सुद्धा जास्त किंमत घेता येत नाही. त्यामध्ये लाईट ,कूलिंग चार्ज सुद्धा जास्त घेता येत नाही .तरी ग्राहकांनी असे आढळल्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका यांच्याशी संपर्क करावा .असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी हवेली तालुका प्रसिद्ध प्रमुख सचिन सुंबे उपस्थित होते.

पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?

Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे

ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…