पुणे : बालेवाडी येथे मागे झालेल्या एका इव्हेन्टमध्ये संगीतकार अजय-अतुल यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करून एड.राधिका कुलकर्णी या आयोजक महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या विरोधात काळे झेंडे घेऊन रविवारी सायंकाळी अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर निदर्शने केली.तसेच घोषणाबाजी केली.त्यानंतर एड.कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना अजय-अतुल यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला.
अण्णाभाऊ साठे सभागृहात फिरोदिया करंडक पारितोषिक वितरण कार्यक्रमास अजय-अतुल हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याचे समजताच कुलकर्णी यांनी निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती.या प्रकरणी संगीतकार अजय-अतुल यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
‘ गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीने त्यांचे कोट्यवधी रुपये वसूल व्हावेत व गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत याकरिता कलर्स मराठी चॅनलला संबंधित लाईव्ह कॉन्सर्ट प्रदर्शित करण्यासाठी प्रस्ताव ठेवला.संगीतकार अजय-अतुल यांनी या इव्हेंटचे आयोजक स्वतःच असल्याचे सांगून कलर्स मराठीला प्रसारणाचे हक्क विकले.त्यातून मोठी कमाई केली.अशा तऱ्हेने त्यांनी गायक म्हणून मानधन घेतले,ठरलेले कलाकार तर नाही आणले,पुढे स्वतःच आयोजक असल्याचे भासवून कलर्स मराठीला हक्क विकले. फसवणूक करत संगीतकार गायक अजय अतुल जोडीने ही रक्कम हडप केली.पाठपुरावा करणाऱ्या आयोजकांना प्रतिसाद दिला नाही.‘,असा आरोप एड.कुलकर्णी यांनी निदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केला.
मात्र,अजय अतुल यांनी संबंधित कॉन्सर्टचे आयोजक आपण स्वतः असल्याचे भासवून परस्पर कलर्स मराठीकडून पैसे गैरमार्गाने स्वतःच्या नावावर घेतले आहेत. तर दुसरीकडे कॉन्सर्टसाठी आलेल्या विदेशी ऑर्केस्ट्रा बँड पथकाला देखील गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंटने वेगळी रक्कम दिलीय. यामुळे गोल्डन एंटरटेनमेंट कंपनीला सर्व बाजुंनी कोटयवधी रुपयांचा फटका बसला आहे.एक रुपया देखील नफा मिळालेला नाही. यामुळे गोल्डन पिरॅमिड एंटरटेनमेंट कंपनीचे संचालक संपूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत.