भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

By: Editor_Manas

On: Saturday, April 13, 2024 10:13 AM

Google News
Follow Us

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘जप राम  ‘ या  भरतनाट्यम नृत्य सादरीकरण  कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला म्हणजे  दि.१६ एप्रिल २०२४ रोजी आयोजन   करण्यात आले आहे. परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटरच्या  वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे.भरतनाट्यम नर्तक डॉ.परिमल फडके यांच्या विद्यार्थिनी सई शेटये,दीप्ती डोळे,तितली घटक,सायली देवधर,विद्या धिडे,रेवती खराडे,नीती नायर,अनुष्का देव यांचे   नृत्य सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार  आहे.प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरील,रामायणावर आधारित  काही निवडक भरतनाट्यम नृत्य रचना हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य असणार आहे.

हा कार्यक्रम मंगळवार,१६ एप्रिल   २०२४ रोजी सायंकाळी ६   वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०२ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now