पुणे, २० एप्रिल २०२४ : प्रसन्न आणि चुणचुणीत व्यक्तिमत्त्व असावे, ही इच्छा बाळगणे हे काही चूक नाही. त्यामुळे काही कॉस्मेटिक बदल केल्याने आपल्या दिसण्याला उठाव येईल, असे आपल्याला वाटत असेल तर एस्थेटिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह क्लिनिक (एआरसी) येथे भेट देण्याची हीच वेळ आहे. प्लॅस्टिक सर्जरीशी संबंधित बाबींसाठीचे हे केंद्र पुण्यात नुकतेच सुरू झाले आहे.
बाणेर पाषाण लिंक रोड येथे असले ले एआरसी हे खरे तर सौंदर्यशास् त्रीय उपचार आणि शस्त्रक्रियां सठी पुण्याचे समर्पित केंद्र आहे. आपला आत्मविश्वास आणि वावर यांमध्ये सुधारणा होण्यासाठी शारीरिक ठेवण महत्त्वाची भूमिका पार पाडते, असं वाटणाऱ्या पुणेकरांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यांच्यासाठी हे केंद्र आहे.एआरसी क्लिनिकचे संचालक आणि सीईओ डॉ. प्रणव ठुसे यांच्या मते, “आपली दिसणारी शारीरिक व्यंगे दूर करण्यासाठी कॉस्मेटिक सुधारणा हा कमाल उपाय आहे. या शस्त्रक्रिया एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य आणि आत्मविश्वास यांच्या संवेदनामध्ये भर घालतात. सौंदर्य शस्त्रक्रिया, जिला कॉस्मेटिक सर्जरी असेही म्हणतात, ही एक अत्यंत विशेष शाखा आहे. शस्त्रक्रिया आणि गैर-शस्त्रक्रिया अशा मार्गांनी एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी तिचा खास वापर होतो. कॉस्मेटिक सुधारणा ही वैद्यकशास्त्रातील खास शाखा आहे, काऱण ती एक कला आहे. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनकडे दर्शनीयतेचे अत्यंत उच्च कौशल्य असावे लागते. त्याला अत्यंत नेमकेपणा आणि काळजीने आपले कार्य करावे लागते.
डॉ. प्रणव ठुसे हे देशातील प्लॅस्टिक सर्जरीच्या क्षेत्रात अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. प्रगत कॉस्मेटिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया यांमधील अनुभव व तज्ज्ञता यांबद्दल त्यांची ख्याती आहे. अनेक बहुमान मिळविलेल्या डॉ. ठुसे यांच्याकडे अत्यंत स्वाभाविक दिसणारे परिणाम निर्माण करण्याची क्षमता आहे.
“आमच्याकडे अनेक प्रकारच्या सौंदर्य शस्त्रक्रिया आहेत. यांमध्ये चेहऱ्याला पुनर्जीवन देणे (फेशियल रिज्युव्हेनेशन – शस्त्रक्रिया व गैर-शस्त्रक्रिया मार्गाने), टमी टक्स, ब्रेस्ट ऑगमेंटेशन, ब्रेस्ट लिफ्ट, लिपोसक्शन, ब्रेस्ट रिडक्शन, कॉस्मेटिक गायनॉकॉलॉजी शस्त्रक्रिया, जबड्यामध्ये सुधार (जॉलाईन करेक्शन), केसांचे रोपण (हेअर ट्रान्सप्लांट्स) इत्यादींचा समावेश आहे. कमालीची सुरक्षा आणि कार्यक्षमता यांच्यासह परिणामकारक शस्त्रक्रिया करण्याची हमी आम्ही देतो,” असे डॉ. ठुसे म्हणाले.ते पुढे म्हणाले, “अलीकडच्या काही वर्षांमध्ये पुण्याच्या वातावरणात लक्षणीय बदल झाला असून त्याच्या गतिमान विकासाचे प्रतिबिंब त्यात पडले आहे.
त्याच प्रमाणे येथील नागरिकांची सौंदर्यविषयक अभिरूचीही लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.”गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाने एआरसी कडे सुसज्ज आहे. शिवाय डॉ. पी. ठुसे शिर, मान, स्तन, बाह्य कर्करोग रिकन्स्ट्रक्टिव्ह, आघात, मुखावरील अस्थिभंग (फ्रॅक्चर)ल इत्यादीसारख्या भूल देण्याची गरज असलेल्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया पुण्यातील आघाडीच्या रुग्णालयांमध्ये करतात.एआरसी क्लिनिकमध्ये रुग्णांच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचारांवर भर दिला जातो.”आम्ही आमच्या रू ग्णांच्या समस्या ऐकून घेतो. सौंदर्य तसेच रीकन्स्ट्रक्टिव्ह उपचारामागे रुग्णाचा काय हेतू आहे हे समजून घेतो. सरतेशेवटी आम्ही परस्पर सहकार्याच्या माध्यमातून काटेकोरपणे आणि काळजीपूर्वकरीत्या प्रत्येक रुग्णासाठी विशिष्ट अशा उपचारांची योजना करतो,