‘वर्ल्ड स्लीप डे’च्या निमित्ताने गोदरेज इंटेरिओतर्फे आपली मॅट्रेस श्रेणी विस्तार योजना सादर

मुंबई, १५ मार्च २०२४: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओ पुढील 3 वर्षात त्याची मॅट्रेस श्रेणी 250 कोटींपर्यंत वाढवण्याची योजना आहे. हा अग्रगण्य फर्निचर सुविधा ब्रँड सर्व किमतीच्या श्रेणींमध्ये त्यांच्या मॅट्रेसचा पोर्टफोलिओ वाढवण्यावर आणि इष्टतम पोश्चर सपोर्टसाठी सोफा बेड, मॅट्रेस बेड, बेसेस आणि ॲक्सेसरीज यांसारख्या संबंधित श्रेणींमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रित करेल. तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करून ब्रँडने नुकतीच एअर सेन्स मॅट्रेसपासून अनेक नाविन्यपूर्ण मॅट्रेसची मालिका सुरू केली आहे. त्यामध्ये व्यवस्थित श्वासोच्छ्वास करता यावा आणि तापमान नियमनासाठी काढता येण्याजोगा आणि धुण्यायोग्य 3D सिल्व्हर मेश टॉप आहे. जोडीला, प्रेशर न्यूट्रलायझिंग झोनसह सुसज्ज असे आमचे पेटंट केलेले पोश्चर सपोर्ट मॅट्रेस आहे. यातून वैयक्तिक शरीराच्या वजनानुसार तयार केलेला बहुविध आधार मिळतो.

गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष (B2C) देव सरकार म्हणाले, “भारतात, आधुनिक जीवनातील वाढता ताण आणि अस्वस्थता मॅट्रेस उद्योगाला आकार देत आहे. आमचा ठाम विश्वास आहे की दर्जेदार, गुणवत्तापूर्ण झोप हे चांगले आरोग्य, उन्नत राहणीमान आणि वाढलेली उत्पादकता यांच्याशी जोडलेली आहे. सपोर्टिव्ह मॅट्रेस चांगल्या झोपेसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला ताजेतवाने आणि स्वास्थ्यपूर्ण वाटते. अलीकडील नियंत्रित चाचण्यांनी झोपेच्या गुणवत्तेवर, वेदना कमी करण्यासाठी आणि पाठीच्या कण्यातील संरेखनावर कुशन डिझाइनचा होत असलेला परिणाम शोधून काढला आहे. त्यातून झोपेमध्ये असलेली गादीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते. गोदरेज इंटेरिओमध्ये, आम्ही आमच्या प्रेशर न्यूट्रलायझिंग आणि थ्रीडी सिल्व्हर मेश तंत्रज्ञानाद्वारे अत्याधुनिक फोम मटेरियलवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच आमच्या डिझाईन तत्वामध्ये काळजीपूर्वक संशोधन यांचे एकत्रिकरण करतो. नावीन्यपूर्ण आणि ग्राहक कल्याणासाठी वचनबद्धतेसह, आम्ही पुढील 3 वर्षांसाठी आमची मॅट्रेस श्रेणी 20% CAGR ने वाढविण्यास तयार आहोत”

व्यक्तींची खर्च करण्याची वाढती क्षमता, एकूणच आरोग्य आणि झोपेच्या गुणवत्तेसाठी मॅट्रेसच्या महत्त्वाबद्दल वाढती जागरूकता हे बाजारपेठेला चालना देणारे काही महत्त्वाचे घटक आहेत.

गोदरेज इंटेरिओने केलेल्या होमस्केप्स अभ्यासानुसार, प्रत्येक तीनपैकी एक सहभागी (३३%) स्वतःच्या घराकडे निवांतपणाची जागा म्हणून पाहतो – वैयक्तिक वेळ, विश्रांती, झोप, ध्यानधारणा, स्वत:ची काळजी आणि बाल्कनीतील बागेत आनंदाचे क्षण घालवण्याची ती जागा असते. एकूणच आरोग्यामध्ये झोपेची महत्त्वाची भूमिका ओळखून प्रवासाच्या अनुभवांमुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांच्या बदलत्या पसंतींना प्रतिबिंबित करत बाजारपेठ आता पारंपरिक गाद्यांपासून विविध श्रेणीकडे वळत आहे. बाजारपेठेत पारंपरिक कॉयर मॅट्रेसेसपासून पू फोम, बॉन्डेड फोम, मेमरी फोम, लेटेक्स आणि बोनेल आणि पॉकेट सारख्या विविध स्प्रिंग प्रकारांसह विविधांगी प्रकार आले आहेत. गोदरेज इंटेरिओ ॲक्युपॅडिक रेंजसह ही मागणी पुरी करतो.  त्यामध्ये ॲग्मॅटिक मॅट्रेस (बोनेल आणि पॉकेट स्प्रिंग प्रकारांमध्ये उपलब्ध) आहेत. केवळ आराम देण्याच्या जोडीला या मॅट्रेसमुळे रक्ताभिसरण आणि स्नायूंच्या दुखण्यापासून लवकर मुक्तता मिळते. ॲक्युपॅडिक ॲग्मॅटिक मॅट्रेस तुम्हाला आराम आणि स्वास्थ्य यांच्या नवीन पातळीवर नेत तुमची झोप उंचावते.

जागतिक निद्रा दिनाच्या निमित्त ब्रँड ग्राहकांना १५% पर्यंत सवलत देत आहे किंवा २२,००० रु.  पर्यंत आकर्षक भेटवस्तू (उशा/कम्फर्टर्स इ.) जिंकण्याची संधी देत आहे.