राष्ट्रीय, फेब्रुवारी 2024: अनेक युगे स्त्रियांनी कष्टांचे आणि कसोट्यांचे ओझे मूकपणे सोसले आहे आणि संयम आणि लवचिकतेचे धडे पुढच्या पिढीतील स्त्रियांना दिले आहेत. आपल्या संसारात सन्मान न मिळण्याचे विषचक्र तोडत कलर्सवरील ‘मंगल लक्ष्मी’ मालिकेतील एक करारी गृहिणी आणि तिची लहान बहीण हिंमतीने हा विचार मांडतात की, प्रेम आणि विवाहाचे सार आहे- सन्मान!
या दोघी बहिणींनी मिळून #चुटकीभरसन्मान हा नात्यांचा आधारस्तंभ कवटाळला आहे आणि त्या बाबतीत एकमएकींसाठी कोणतीही तडजोड करणे त्यांना मान्य नाही. या दोन बहिणींच्या कहाणीत मोठी बहीण मंगल आपल्या लक्ष्मी या धाकट्या बहिणीसाठी अशा स्थळाच्या शोधात आहे, ज्याच्याकडून तिला आदर, सन्मान मिळेल. त्याच वेळी लक्ष्मी देखील सर्व परींनी आपल्या मोठ्या बहिणीला मदत करत आहे. दीपिका सिंह, सानिका अमित आणि नमन शॉ यांनी साकारलेल्या अनुक्रमे मंगल, लक्ष्मी आणि अदित या व्यक्तिरेखांनी नटलेली, सुझाना घईच्या पॅनोरमा एन्टरटेन्मेंट निर्मित मंगल लक्ष्मी ही मालिका 27 फेब्रुवारी पासून सुरू होत असून ती दररोज रात्री 9:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे, फक्त कलर्स वाहिनीवरून!
दिल्लीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ‘मंगल लक्ष्मी’ ही प्रेम आणि बलिदानाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. यात दोन बहीणींची आणि एकमेकींना सन्मान मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रवासाची गोष्ट आहे. मंगल ही एक प्रातिनिधिक भारतीय स्त्री आहे, जी अगदी सराईतपणे घरातील कर्तव्ये पार पाडते आणि त्याचवेळी आपल्या कुटुंबावर, विशेषतः आपल्या बहिणीवर जिवापाड प्रेम करते. वयाच्या मानाने समंजस असलेली मंगलची बहीण लक्ष्मी आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांचे कपड्यांचे दुकान चालवते आहे. तिच्या नातेवाइकांचे प्रेम तिला मिळालेले नाही. आपल्या धाकट्या बहिणीचे भले चिंतणारी मंगल तिच्यासाठी अशा मुलाच्या शोधात आहे, जो तिला बरोबरीने वागवेल. दुसरीकडे, लक्ष्मी देखील मंगलला तिच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या अनादराविरुद्ध बोलण्यासाठी उद्युक्त करते, आणि सन्मानाची मागणी करण्यासाठी प्रोत्साहित करते. आपल्या संसारातील समस्यांना तोंड देताना मंगल आपल्या धाकट्या बहिणीसाठी सुयोग्य वर शोधण्यात यशस्वी होईल का?
मंगलची भूमिका करत असलेली लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंह म्हणते, “एक अभिनेत्री म्हणून आपल्या प्रेक्षकांना आणि खास करून आपल्या देशातील स्त्रियांना आपल्याशा वाटतील अशा भूमिका करण्याकडे माझा कल असतो. एका मोठ्या विश्रांतीनंतर कलर्ससाठी काम करताना मला आनंद होत आहे. या मालिकेत दोन स्त्रियांची गोष्ट आहे. ज्या चार-चौघींसारख्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षा देखील साध्या आहेत. मला या मालिकेतील जी गोष्ट सगळ्यात आकर्षक वाटली, ती म्हणजे, जेव्हा प्रेक्षक ही मालिका बघतील, तेव्हा त्यांच्या हे लक्षात येईल की, स्त्रिया प्रत्येक परिस्थिती किती संवेदनशीलतेने आणि खोलात जाऊन हाताळतात. माझ्या जीवनातील अनेक मंगल माझ्या परिचयाच्या आहेत आणि दुसऱ्या स्त्रीसाठी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची जी ताकद आहे, त्याला तोड नाही. माझ्या जीवनातील या सगळ्या मंगलांना मी माझा परफॉर्मन्स समर्पित करते.”
लक्ष्मीची भूमिका करत असलेली सानिका अमित म्हणते, “कलर्सवरील या अद्भुत मालिकेच्या आणि व्यक्तिरेखेच्या माध्यमातून टेलिव्हिजन उद्योगात प्रवेश करत असताना मी रोमांचित आहे. माझ्या पहिल्याच टीव्ही मालिकेत मला प्रमुख भूमिका मिळेल आणि तीही अशा अष्टपैलू सह-कलाकारांसोबत, अशी मी कल्पनाच केली नव्हती. माझ्यासाठी ‘मंगल लक्ष्मी’ मालिकेची सगळ्यात खास गोष्ट ही आहे की, यात दोन महिलांची गोष्ट आहे, ज्यांचा प्रवास प्रेरणादायक आहे. ही अशी गोष्ट आहे, जी मला स्वतःला प्रेक्षक म्हणून टेलिव्हिजनवर बघायला नक्कीच आवडली असती. ती गोष्ट प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे.”
अदितची भूमिका करणारा नमन शॉ म्हणतो, “नकारात्मक छटा असलेली अदितची बहुपेडी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते. मला आशा आहे की, प्रेक्षकांचे फक्त मनोरंजनच होणार नाही, तर ही मालिका त्यांना त्यांच्या नात्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांच्या स्थानाबद्दल विचार करायला देखील प्रवृत्त करेल. स्त्रीबद्दल सन्मान नसल्यामुळे विवाहित जोडप्यात कसे वितुष्ट येते हे मी अदितच्या व्यक्तिरेखेमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी माझ्या व्यक्तिरेखेचा तिरस्कार केला, तर माझे काम उत्तम साधले असे मी मानेन!”
‘मंगल लक्ष्मी’ या हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिकेसाठी सज्ज व्हा. मालिका 27 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9:00 वाजता सुरू होत असून ती दररोज प्रसारित करण्यात येईल, फक्त कलर्स वाहिनीवरून!