कोपा पुण्यात प्रथमच अरमानी एक्सचेंज इंडियाचे A|X प्रेस प्ले घेऊन येत आहे

पुणे, भारत – मार्च, 2024: अरमानी एक्सचेंज इंडिया आपल्या A|X Press Play च्या तिसऱ्या आवृत्तीसाठी पूर्ण तयारीत आहे. 9 आणि 10 मार्च 2024 अशा दोन दिवशी हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. संगीत, तंत्रज्ञान आणि लक्झरी अशा तिघांचाही यात संगम आहे. पुण्यातील कोपा मॉल येथे संध्याकाळी 4 पासून हा कार्यक्रम रंगणार आहे. आधी कधीही अनुभव घेतला नसेल असा सुंदर अनुभव हा कार्यक्रम पुणेकरांना देईल.

ग्लोबल बीट्स आणि लोकल ठेक्याच्या साहाय्याने A|X Press Play उत्तम फ्युजनचे वचन देते. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कलाकार आणि उदयोन्मुख स्थानिक प्रतिभांचा उपयोग होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी Dualist Inquiry (DJ Set), Todh Teri (Live), Blurry Slur X Orbs, आणि Nariki सारखे कलाकार मंच गाजवतील. तर दुसऱ्या दिवशी Kohra, Prismer, Mogasu X Baawra, आणि Ayna, यांच्या कार्यक्रमात जान आणतील आणि कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेतील.

या कार्यक्रमात, प्रेक्षक पूर्णपणे हरवून जातील हे नक्की. हा कार्यक्रम ते आपल्या जाणीवांसह अनुभवतील. हे नाविन्यपूर्ण प्रोजेक्शन मॅपिंग तंत्राची जादू देखील दाखवेल. जिथे प्रकाश आणि प्रतिमा पृष्ठभागावर समतोल साधून असतील. तुम्ही अनुभवी उत्साही असाल, कलात्मक क्षेत्रांचा अधिक अनुभव घेण्याची इच्छा असेल किंवा शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यास उत्सुक असाल, तर A|X Press Play एक अतुलनीय अनुभव देईल, जो इतरांपेक्षा निश्चितच जास्त आहे.

या इव्हेंटचे पास SkillBox वर ऑनलाइन उपलब्ध होतील, ज्यामुळे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या रसिकांचा त्रास वाचेल. हा कार्यक्रम कोपाद्वारे क्युरेट केलेल्या ग्राउंड ब्रेकिंग आणि विशिष्ट अनुभवांचा एक भाग आहे. जो संपूर्ण समुदायासाठी शहरी अनुभवाची पुनर्कल्पना अधिक समृद्ध करतो.