कॅटिनी इंडियाची पुण्यात गुंतवणूक… सणसवाडीत अत्याधुनिक उत्पादन सुविधा असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन

पुणे : युरोपमधील व्यावसायिक वाहन विभागातील बाजारपेठेत अग्रणी असलेल्या कॅटिनी इंडियाने पुण्यातील सणसवाडी भागात आपला उत्पादन विभाग सुरु केला आहे. सणसवाडी येथे विविध वाहनांसाठी लागणारे विविध गीअर्स, शाफ्ट्स आणि सिंक्रोनायझर्स तयार केले जाणार आहेत. जागतिक दर्जाची उत्पादन सुविधा देणाऱ्या कॅटिनी इ फ़िगलीओ (Cattini e FIGLIO) ची उपकंपनी म्हणून कॅटिनी इंडिया आपली ओळख निर्माण करत आहे. देशातील पहिला संपूर्णपणे अत्याधुनिक सिंक्रोनायझर्स निर्मितीचा कारखाना हा पुण्यातील सणसवाडी येथे ५ एकरात विस्तारला आहे. यासाठी अल्कॉर क्रॉस बॉर्डर एम अँड ए प्रा. ली. ने कॅटिनी इंडियासाठी व्यवहाराचे नियोजन, रचना आणि अंमलबजावणी केली. कंपनीच्या समारंभावेळी चेअरमन लॉरेन्झो अमेडीओ प्रिमो कॅटिनी, कॅटिनी इंडियाचे संचालक थॉमस मॅथ्यू आणि इतर व्यवस्थापकीय व्यक्तींनी या सुविधेचे उद्घाटन केले.

कॅटिनीचे पुण्यातील या नवीन उत्पादन सुविधा भारतीय गीअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याबरोबर आशिया खंडातील आपले स्थान वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेने पुण्यात प्रगत तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्ये येण्याबरोबर केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण होणार नाहीत तर एक उत्पादन केंद्रही निर्माण होईल, अशी टिप्पणी कॅटिनी इंडियाचे संचालक थॉमस मॅथ्यू यांनी केली.

कॅटिनी इंडिया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण २.५ दशलक्ष युरो (अंदाजे २१५ दशलक्ष भारतीय रुपये) ची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीचा उपयोग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज आधुनिक उत्पादन युनिट उभारण्यासाठी केला जाईल, ज्यामुळे कंपनी भारतीय बाजारपेठेतील वाढत्या गरजा पूर्ण करू शकेल.

कॅटिनी इंडियाचे संचालक थॉमस मॅथ्यू म्हणाले की, पुण्यातील या गुंतवणुकीमुळे भारतीय बाजारपेठेत कंपनीचा प्रवेश झाला असून आशिया खंडात उत्पादन वाढवण्याच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे प्रगत तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि कौशल्ये येतील, ज्यामुळे केवळ रोजगाराच्या संधीच निर्माण होणार नाहीत तर पुण्यात उत्पादन केंद्रही निर्माण होईल. 

कॅटिनीचे अध्यक्ष लॉरेंझो अमेंडओ म्हणाले की, कॅटिनीची स्थापना १९५० मध्ये मोटारसायकल आणि गवत उचलण्यासाठी लहान गीअर्स तयार करण्यासाठी करण्यात आली आणि चार वर्षांनंतर ते कॉर्पोरेशन बनले. विविध प्रकारच्या गीअर्स, शाफ्ट्स आणि सिंक्रोनायझर्ससाठी युरोपमधील व्यावसायिक वाहनांच्या विभागातील बाजारपेठेतील अग्रणी कंपनी आहे. प्रगत गियर उत्पादन टेम्पलेटची प्रतिकृती तयार करण्यापासून ते भारतात कंपनीसाठी अनुकूल वातावरण बनविण्यासाठी आमच्या सहकार्यांनी खूपच अथक परिश्रम घेतले आहेत. भारतीय बाजारपेठेत पदार्पण करत असताना कॅटिनी इंडियासोबत या धोरणात्मक गुंतवणुकीत भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. पुण्यात केवळ नवीन सुविधा अथवा प्रगत तंत्रज्ञान किंवा कौशल्य आणणार नाही तर रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान देईल. भारतात कॅटिनीला यशस्वी होण्यासाठी कायम पाठिंबा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

CATTINI E FIGLIO SRL बद्दल


संस्थापक पिएरिनो कॅटिनी यांनी १९५० मध्ये मोटारसायकल आणि गवत उचलण्यासाठी लहान गिअर्स तयार करण्यासाठी व्यवसायाची स्थापना केली. नंतर १९५४ मध्ये, हे कॉर्पोरेशनमध्ये बदलले आणि हळूहळू त्याचा व्यवसाय ट्रान्समिशन गियर्स, गियर शिफ्टिंग सिस्टम आणि गियर घटकांवर केंद्रित केला. Cattini e Figlio महत्वाकांक्षा, दृढनिश्चय, नाविन्य आणि सचोटीने चालविले जाते. कॅटिनी व्यावसायिक, हेवी-ड्युटी वाहने आणि सर्वाधिक मागणी असलेल्या औद्योगिक अनुप्रयोग आणि ई-ड्राइव्हच्या संपूर्ण ड्राईव्हलाइनची बाजारपेठेतील आवश्यकता व्यापते.