Latest Mobile Phones : ९ हजारांच्या आत घ्या आयफोन सारखा दिसणारा फोन; 8GB RAM सह मिळतोय 50MP Camera

Latest Mobile Phones : लोक आयफोन फक्त ब्रँडसाठी घेतात असं बऱ्याचदा म्हटलं जातं. अनेकदा अँड्रॉइड फोनला देखील आयफोन सारखा लूक देण्यासाठी अनेक प्रकार केले जातात. परंतु टेक ब्रँड टेक्नोनं आता भारतात आयफोन सारख्या डिजाइनसह नवीन स्मार्टफोन Tecno Spark 20C लाँच केला आहे. हा १० हजारांच्या बजेट मधील फोन आहे जो 8GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh Battery सारखे फीचर्ससह आला आहे.

Tecno Spark 20C ची किंमत : टेक्नो स्पार्क २०सी स्मार्टफोन भारतात ८जीबी रॅम आणि १२8 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हा लो बजेट मोबाइल फोन फक्त ८,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. लाँच ऑफर अंतर्गत कंपनी हा फोन १,००० रुपयांच्या डिस्काउंटसह विकेल, त्यामुळे Tecno Spark 20C ची किंमत ७,९९९ रुपये होईल. मोबाइलची विक्री ५ मार्चपासून शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर सुरु होईल तसेच हा Gravity Black, Mystery White, Magic Skin Green आणि Alpenglow Gold कलरमध्ये विकत घेता येईल.

टेक्नो स्पार्क २०सी स्मार्टफोन ७२० x १६१२ पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५६ इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. या स्क्रीनवर ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि ४८०निट्स ब्राइटनेस असे फीचर्स मिळतात.

Tecno Spark 20C स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर लाँच झाला आहे जो हायओएस १३ सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या मोबाइलमध्ये २.२गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालणारा मीडियाटेक हीलियो जी३६ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतात टेक्नो स्पार्क २०सी ८जीबी रॅमसह लाँच झाला आहे. हा मोबाइल मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह आला आहे जी ८जीबी वचुर्अल रॅम देते. हा वचुर्अल रॅम आणि फिजिकल रॅमसह मिळून Spark 20C ला १६जीबी रॅमची ताकद देतो. या फोनमध्ये १२८जीबी इंटरनल स्टोरेज तसेच १टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळतो.

फोटोग्राफीसाठी टेक्नो स्पार्क २०सी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एफ/१.६ अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर देण्यात आला आहे तसेच साथ हा फोन एआय सेंकेंडरी लेन्सला देखील सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हा टेक्नो फोन IPX2 रेटिंगसह आला आहे. या स्वस्त मोबाइल फोनमध्ये Dual DTS Stereo Speakers, HyperEngine 2.0, 1TB SD card सपोर्ट सारखे फीचर्स देखील मिळतात. पावर बॅकअपसाठी Tecno Spark 20C स्मार्टफोन ५,०००एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात १८वॉट फास्ट चार्जिंग आहे. कंपनीचा दावा आहे की फोन ५० मिनिटांत ५०% चार्ज होऊ शकतो.