55 ex-Cong corporators Join BJP : चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का !

55 ex-Cong corporators Join BJP : नांदेड – वाघाळा महापालिकेतील कॉँग्रेसच्या मागील वेळेस निवडून आलेल्या ५५ निर्वाचित व स्विकृत नगरसेवकांनी शनिवारी (ता. २४) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे माजी आमदार अमर राजूरकर व इतरांनी स्वागत केले. यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी सभापतींचा समावेश आहे. याचा मोठा फटका येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.

Upcoming Smartphones : मार्चमध्ये Samsung Galaxy F 15 ते Realme 12+5G हे दमदार स्मार्टफोन्स होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

माजी आमदार अमर राजूरकर यांनी याबाबत माहिती दिली. खासदार अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महापालिकेच्या ५२ माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. श्री. चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर कालपासून अनेक माजी नगरसेवकांनी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच काही माजी नगरसेवकांनी आज झालेल्या एका बैठकीत भाजपला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ५५ माजी नगरसेवकांनी खासदार चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

Local Train Video : रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, कारवाईची होतेय मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन आतापर्यंत निवडून आलेले व स्विकृत मिळून एकूण ५५ माजी नगरसेवक भाजपमध्ये आले आहेत. दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचे स्वागत व अभिनंदन केले.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे श्री. चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

नांदेड – वाघाळा महापालिकेच्या मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८१ पैकी ७३ नगरसेवक निवडून आले होते. शनिवारी ५५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काळात त्यातील आणखी काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेकजण खासदार श्री. चव्हाण आणि भाजपसोबत येण्यास इच्छुक आहेत असं माजी आमदार अमर राजूरकर यांनी म्हटलं आहे.

Pune Crime : पत्नीसोबतचा वाद, तरुणाने पोलिस चौकीसमोर केले स्वतःवर ब्लेडने वार; पुण्यातील घटना

Criminal Laws Notification : तीन नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून देशभरात होणार लागू; सरकारनं काढलं नोटिफिकेशन

Gautami Patil : कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, जाणून घ्या काय आहे नाव…

पुणे : रिंगरोडबाबत मोठा निर्णय : आचारसंहिता काळात भूसंपादन करायचे की नाही? विभागीय आयुक्तांनी दिला ‘हा’ आदेश

Suicide : शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतलाच…पतीवर जीवापाड प्रेम करणार्‍या पत्नीची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

BIG NEWS : पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, अशी आहे पुणेकरांसाठी योजना

Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

BIG NEWS : पहिल्या नजरेतच तो बिजनेस वुमनच्या नजरेत भरला, त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर लावला आणि मग,