माखजन इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर पुणे येथे संपन्न

पुणे : विलास गुरव

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल, माखजन (सरंद) शाळेतील १०वी अ आणि ब वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पुणे येथे संपन्न झाला. यानिमित्ताने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या कोण काय करतोय यावर शालेय सवंगड्यांनी गप्पाटप्पा मारल्या.

माखजन इंग्लिश स्कूलने आजवर त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान देऊन व सर्वगुणसंपन्न शिक्षण व संस्कार दिल्याने आज या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. काहीजण कामानिमित्त पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी शहरात जाऊन अर्थार्जन करत आहेत. तर काहीजण गावाकडेच राहून उदरनिर्वाह करत आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या बालपणाच्या सवंगड्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी उदय सावंत , विनायक विचारे,अमित पाटणकर आणि काही ठराविक मित्रांनी पुढाकार घेतला आणि तो प्रत्यक्षात आणत १९९४-१९९५ सालातील १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टूगेदर पुणे येथे घडवून आणला. हा गेटटुगेदर दि. ६ व ७ जानेवारी रोजी एकांत फार्म हाऊस, पुणे येथे संपन्न झाला.

सदर १९९४-१९९५ सालातील १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळून एक सामाजिक ग्रुप तयार केला आहे. या ग्रुप मार्फत सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी इयता १० वीच्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. तसेच या ग्रुपमध्ये काही आपत्कालीन समस्या निर्माण झाली तर त्यासाठी फंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या गेट टूगेदर कार्यक्रमास रिध टिळक, स्वाती दिंडे, सुरेखा साळवी, वैशाली भायजे, ज्योती गुरव, ईरफाना पटेल, उदय सावंत, किशोर सावंत, संदिप कारकर (वापी), सुनिल धुलप, विलास लाड, हेमा चव्हाण, विजय जड्यार, दिनेश मोरे, सुनिल कदम, दिपक पवार, स्मिता कांबळे, दिपक कातकर, सुनिल कातकर, सुनिल किंजळकर, सुभाष किंजळकर, विनायक विचारे, रुपेश सुर्वे, राहुल नेहेते, संजय गुरव -(बेळगाव), मनिषा पेडणेकर, अमित पाटणकर, मिनल पाटणकर, शैलेश धामणस्कर, सचिन बाष्टे, निलेश लाड, रविंद्र जाधव, दीपक शिगवण, प्रमोद पाटील, अतुल डिंगणकर, तब्बसूम मोडक इ. माजी विद्यार्थी उपस्थित होते.