#Fake Compalint : तुमच्याविरोधात कुणी खोटी पोलीस तक्रार केली तर काय कराल?; घाबरण्यापेक्षा हे वाचा

#Fake Compalint : पोलिसांकडे खोटी तक्रार करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरतो. तक्रार दाखल करून घेणे हे पोलिसांचे कर्तव्य जरी असले तरी त्याची शहनिशा करून चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित तक्रारीनुसार संशयिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली जाते

मात्र चौकशीत तक्रारीत तथ्य आढळले नाही, तर पोलिस अंमलदार अथवा अधिकाऱ्यांकडून कारवाईदेखील केली जाऊ शकते. वचपा काढण्याचा नाद महागात पडेल. अनेकदा आपापसातील भांडणातून खोटे FIR दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येतात.

कायदा अधिकारांच्या रक्षणासाठी आहे. मात्र अनेकदा त्याचा गैरवापर केला जातो. हा गैरवापर टाळणे आवश्यक आहे, अन्यथा मोठ्या अडचणीत सापडू शकता. जाणुनबुजून तुमच्यावर कुणी खोटी तक्रार केली असेल तर काय कराल वाचा

कधी घ्यावा कलम ४८२चा आधार? एखाद्या व्यक्तीने जाणुनबुजून जर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असल्यास त्याला आव्हान देण्यासाठी फौजदारी दंड प्रक्रिया कलम ४८२ नुसार ती व्यक्ती आव्हान देऊ शकते.

fake-compalint-photo

या कलमांतर्गत वकिलाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करता येतो. खोटी तक्रार करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यात फिर्यादीच संशयित आरोपी होऊ शकतो. न्यायालयात जर त्याची तक्रार खोटी होती हे सिद्ध झाल्यास फिर्यादी अडचणीत येऊ शकतो.

याबाबतचे सबळ पुरावे पोलिसांनी सादर केले तर न्यायालयाकडून दंड अथवा कारावास किंवा दोन्हीही प्रकारची शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे खोटी तक्रार करणे अनेकदा अंगलट येऊ शकते. एखाद्याविषयी हेतूपरस्पर आरोप करणे योग्य नाही.

#Politics : आता बोला….शिंदे गटाचे 7 खासदार भाजपाच्या संपर्कात

‘FIR’ म्हणजे नेमके काय? ‘एफआयआर हे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अर्थात गुन्ह्याची प्राथमिक खबर असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तेव्हा ज्यांच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पीडित व्यक्ती हा फिर्यादी म्हणून पोलिस ठाण्यात हजर राहून घडलेला प्रकार पोलिस अमलदार अथवा अधिकाऱ्यांकडे कथन करतो.

दखलपात्र, अदलखपात्र म्हणजे काय? दखलपात्र गुन्हा व अदखलपात्र गुन्हा यांच्यातील फरक जाणून घेणे गरजेचे आहे. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र ठरतो. किरकोळ स्वरुपाचा गुन्हा अदखलपात्र समजला जातो. दखलपात्र असेल तर पोलीस त्याला लेखी स्वरूप देतात व टंकलिखित स्वरुपात त्याची फिर्याद नोंदवून घेतात.