Crime News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुले तोडल्याच्या रागातून अंगणवाडी सेविकेचे नाक कापले

crime news : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बासुर्ते गावात एक धक्कादायक घटना घडली. मुलांनी बागेतील फुले तोडल्यामुळे एका अंगणवाडी सेविकेवर प्राणघातक हल्ला करून तिचे नाक कापण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी एक दिवसांचा बंद ठेवत मोर्चा काढून आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली.

Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीमार

कल्याणी मोरे असे आरोपीचे नाव आहे. तर सुगंधा मोरे असे पीडित महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी घडली. सुगंधा मोरे या अंगणवाडी सेविका आहेत. गेल्या २० वर्षांपासून त्या या ठिकाणी काम करत आहेत. दरम्यान, कल्याणी मोरे यांच्या बागेतील फुले सुगंधा मोरे यांच्या मुलांनी तोडल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी सुगंधा मोरे यांचे नाक तोडले. या हल्ल्यात सुगंधा मोरे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झल्याने त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

Gangster’s girlfriend : गँगस्टरची गर्लफ्रेंड असणाऱ्या मॉडेलची हॉटेलमध्ये हत्या; BMW कारमधून मृतदेहाचे विल्हेवाट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २० वर्षांपासून महिला आणि बाल विकास विभागामार्फत चालविली जाणारी अंगणवाडी ही आरोपीच्या मालकीच्या भाड्याने घेतलेल्या ब्लॉकमध्ये आहे. शाळेतील मुले ही कल्याणी मोरेच्या बागेत गेली आणि काही फुले त्यांनी तोडली. यामुळे आरोपीने सायकलसह सुगंधा मोरे यांचा पाठलाग करून त्यांच्याववर हल्ला केला.

BIG NEWS MORNING : आज मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची दाट शक्यता; तीन समन्स, तरीही ईडी चौकशीसाठी गैरहजर

पोलिस आयुक्त सिद्दारमप्पा म्हणाले, “मुलांना बागेत सोडमुळे आरोपीने रागाच्या भरात हे कृत्य केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला. आरोपीला बुधवारी पोलिसांनी अटक केली. या प्रकानरी काकाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या असून पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.

husband-wife : पतीने पत्नीला लॉजवर रंगेहात पकडले; रूमचा दरवाजा तोडला, पत्नी प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बकर यांच्याकह मतदारसंघामध्ये ही घटना घडली, त्यांनी या घटनेचा निषेध केला. पीडितेच्या कुटूंबाला नोकरी नियमित करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

बहिण भावामध्ये त्या रात्री नको ते घडलं, कोर्टानं नकार देताना स्पष्ट सांगितलं…

या घटनेच्या निषेधात, शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करून मुख्यालयावर मोर्चा काढला. आरोपींविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. तसेच अंगणवाडी सेविकांना संरक्षण मिळावे याची मागणी देखील केली.

Rape Case | भयानक, आधी प्रियकर नंतर त्याच्या मित्राकडून बलात्कार, मग 13 जणांकडून लॉजवर अत्याचार; वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार; मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले