Sexual abuse : मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार; विवस्त्र करून…

पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Sexual abuse of niece by aunt; Undressing…) या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे शहर हादरले आहे. या प्रकारावर संताप देखील व्यक्त केला जात आहे.

Christmas Day 2023 : शाळेत मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवू नका अन्यथा कारवाई, कुणी काढले फर्मान?

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २ वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करत असे. त्याचबरोबर तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करत असे.

Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्यारायची मुलाखत सुरू असताना घडला धक्कादायक प्रकार, जाणून घ्या सविस्तर प्रकरण

कोरोनाच्या काळात चिमुकलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी पाठवले होते. फिर्यादी महिलेचा भाऊ हवाई दलात नोकरी करतो. तो आपल्या कुटुंबासह हवाई दल वसाहतीत राहतो. कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Corona Update : देशात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू; जेएन.1 व्हेरियंटचे 23 रुग्ण

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मामी या ९ वर्षांच्या चिमुकलीला सतत मारहाण करत होती. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Top Trending Searches in India 2023 : यावर्षी भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले ‘हे’ विषय; वाचा संपूर्ण यादी

Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…