अमृतांजन इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट बाजारपेठेत दाखल; ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड   

राष्ट्रीय, फेब्रुवारी २०२४: आरोग्य देखभाल आणि वेलनेस उद्योगक्षेत्रातील नामांकित कंपनी अमृतांजन हेल्थकेयरने इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट बाजारपेठेत दाखल केले आहे. हे इलेक्ट्रोलाईट पेय शरीरातील ऊर्जा पातळी पूर्ववत करून डिहायड्रेशन व थकवा दूर करते. त्यासोबतच अमृतांजनने इलेक्ट्रो+ चा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची निवड केल्याची देखील घोषणा केली आहे.

इलेक्ट्रो+ हे प्रभावी सेल-लेव्हल हायड्रेशन पुरवून इलेक्ट्रोलाईटची भरपाई करण्यासाठी तयार करण्यात आले असून शरीरातील सामान्य ऊर्जा पातळी पुन्हा मिळवून देऊन थकवा दूर करते. इलेक्ट्रो+ ब्रँडने ताजेतवाने करणाऱ्या लो शुगर पेयाचा पर्याय उपलब्ध करवून देऊन आरोग्याविषयी जागरूक ग्राहकांना प्राधान्य देण्याचे धोरण कायम राखले आहे.

इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट सादर करण्याबरोबरीनेच अमृतांजनने भारतीय क्रिकेटमधील युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडसोबत हातमिळवणी केल्याची देखील घोषणा केली आहे. खेळाप्रती ऋतुराजची निष्ठा आणि कायम सर्वोत्तम कामगिरी बजावण्याप्रती बांधिलकी आरोग्य आणि सक्रियतेला प्रोत्साहन देण्याच्या इलेक्ट्रो+ च्या मूलभूत मूल्यांना अतिशय अनुरूप आहे. ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून ऋतुराज गायकवाड इलेक्ट्रो+ चे लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आणि एकंदरीत आरोग्यासाठी हायड्रेशन व इलेक्ट्रोलाईट संतुलनाला प्राधान्य देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

इलेक्ट्रो+ साठी तयार करण्यात आलेल्या नवीन टीव्हीसीमध्ये डिहायड्रेशन व थकवा दूर करण्यात तसेच थकवणारे शारीरिक काम करताना देखील शरीरातील जल स्तर सामान्य राखण्यासाठी इलेक्ट्रो+ चे महत्त्व सांगण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये ऋतुराज गायकवाड मैदानावर खेळताना दिसतो, तो चांगलाच थकलेला आहे आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये त्याला शरीरातील ऊर्जा पुन्हा मिळवून देईल अशा पेयाची गरज आहे. एखाद्या सर्वसामान्य पेयापेक्षा जास्त प्रभावी पेयाची त्याला गरज आहे. शरीरातील ऊर्जा पातळीची भरपाई करून सेल्युलर स्तरावर रिहायड्रेट करण्यात इलेक्ट्रो+ प्रभावी असल्याचे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. थकवा दूर करून शरीरातील ऊर्जा, सक्रियता पुन्हा मिळवून देण्यासाठी इलेक्ट्रो+ महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच सक्रिय जीवनशैली जगू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा आवश्यक साथीदार आहे यावर व्हिडिओमध्ये भर देण्यात आला आहे.

अमृतांजन हेल्थ केयरचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री एस संभू प्रसाद यांनी इलेक्ट्रो+ चे लो शुगर व्हेरियंट प्रस्तुत करण्यात आल्याबद्दल आणि ऋतुराज गायकवाडसोबत सहयोगाविषयी उत्साह व्यक्त करताना सांगितले, अमृतांजनमध्ये आम्ही आरोग्य  कल्याण यांना प्रोत्साहन देणारी अभिनव उत्पादने सादर करण्यासाठी वचनबद्ध आहोतइलेक्ट्रोचे लो शुगर व्हेरियंट आमच्या ग्राहकांच्या नवनवीन वाढत्या गरजा पूर्ण करण्याप्रती आमची निष्ठा दर्शवतेअमृतांजन परिवारात ऋतुराज गायकवाडचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की इलेक्ट्रोसोबत ऋतुराजचा सहयोग सर्व देशवासियांना प्रभावित करेल.”

अमृतांजन हेल्थ केयर लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री मणी भगवतीश्वरन यांनी इलेक्ट्रो+ चा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून ऋतुराज गायकवाडचे महत्त्व सांगितले, “ऋतुराज गायकवाड मधील ऊर्जा आणि कोणत्याही परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्याची शक्ती यामुळे तो इलेक्ट्रोचा सर्वोत्तम प्रतिनिधी ठरला आहेहा सहयोग फक्त जाहिरातीपुरता मर्यादित नाही तर जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच संपूर्ण दिवसभर उर्जावान राहून थकवा दूर ठेवण्याचा प्रभावी मार्ग म्हणून इलेक्ट्रो+  प्रत्येकाची आवड बनावी यासाठी देखील उपयुक्त ठरेलसातत्याने सर्वोत्तम कामगिरी बजावण्याप्रती निष्ठावान असल्यामुळे हायड्रेशन  इलेक्ट्रोलाईट संतुलनाला प्राधान्य देण्याचे महत्त्व ग्राहकांना पटवून देण्यासाठी ऋतुराज सर्वात योग्य आहेऋतुराज गायकवाडसोबत हा सहयोग यशस्वी ठरेल आणि सर्वोत्तम आरोग्य  सक्रियतेसाठी दररोज इलेक्ट्रोलाईट संतुलन राखणे आवश्यक असल्याची जागरूकता ग्राहकांमध्ये निर्माण केली जाईल याची आम्हाला खात्री आहे.”

या सहयोगाविषयी ऋतुराज गायकवाड यांनी सांगितले, “इलेक्ट्रोब्रँडसाठी अमृतांजन हेल्थकेयरसोबत भागीदारी करताना मला अतिशय आनंद होत आहेहायड्रेशन आणि ऊर्जा कायम राखणे फक्त माझ्यासारख्या खेळाडूसाठीच नव्हे तरप्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहेसर्वोत्कृष्ट कामगिरी  एकंदरीत आरोग्यासाठी इलेक्ट्रोलाईटचे सुयोग्य संतुलन राखणे आवश्यक असतेतुम्ही मैदानावर खेळत असाल किंवा दररोजची कामे करत असाल तरी हे गरजेचे आहेमला आनंद आहे कीयासाठीचा उपाय अमृतांजन इलेक्ट्रोने आपल्याला उपलब्ध करवून दिला आहेमला आशा आहे कीशरीरातील पाण्याची पातळी योग्य राहिल्यास मूडस्मरणशक्ती आणि एकाग्रता यांना चालना मिळते तसेच एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यात मदत होते.”

इलेक्ट्रो+ चे रेग्युलर तसेच लो शुगर व्हेरियंट बाजारपेठेत उपलब्ध आहे. थकवा दूर करून ऊर्जा स्तराची भरपाई करणाऱ्या, शरीर ताजेतवाने करणाऱ्या पेयाचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे.