राष्ट्रीय, ऑगस्ट २०२३: भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज ‘इन्फिनिटी सेव्हिंग्स अकाउंट’ हा पहिलाच नवीन बचत खाते प्रकार सादर केल्याची घोषणा केली. सबस्क्रीब्शन आधारित मॉडेलचा अधिकाधिक अंगीकार करणाऱ्या डिजिटली जाणकार ग्राहकांना सेवा देण्यासाठी ही सुविधा आहे. ही नाविन्यपूर्ण बचत खाते सुविधा अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना वैशिष्ट्यपूर्ण सवलती सादर करते. माफ केलेली सरासरी मासिक शिल्लक (AMB) आवश्यकता, डेबिट कार्ड्स सुविधा आणि १५० रुपयांच्या छोट्या मासिक आवर्ती शुल्क किंवा १६५० रुपयांच्या वार्षिक शुल्काच्या बदल्यात सर्व स्थानिक शुल्क माफ यासारख्या विशेष सुविधा पुरविते.
‘इन्फिनिटी सेव्हिंग अकाऊंट’ केले सादर
- किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही
- कोणत्याही देशांतर्गत व्यवहारावर काहीही शुल्क नाही
- मोफत डेबिट कार्ड आणि एटीएममधून अमर्यादित पैसे काढण्याची सुविधा
- चेकबुक वापरावर किंवा मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार/पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाही
- leap.axisbank.com वर एंड-टू-एंड डिजिटल खाते उघडणे
बँकिंग अनुभवामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने नवीन प्रकार सादर करण्यात आला आहे. व्हिडिओ केवायसी प्रक्रियेद्वारे ग्राहक पूर्णपणे डिजिटल पद्धतीने खाते उघडू शकतात. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तावासह, बँक मासिक आणि वार्षिक अशा दोन सबस्क्रिप्शन- धारित लवचिक योजना सादर करते. मासिक योजनेसाठी १५० रुपये (जीएसटी सह) आकारले जातात आणि किमान सदस्यता कालावधी ६ महिन्यांचा आहे. सुरुवातीच्या ६ महिन्यांनंतर, योजना ३० दिवसांच्या चक्रावर सुरू राहते. त्यानंतर दर ३० दिवसांनी १५० रुपये कापून घेतले जातात. वार्षिक योजनेवर १६५० रुपये (जीएसटी सह) शुल्क आकारले जाते आणि ३६० दिवसांसाठी त्याचे अगणित लाभ मिळतात. या कालावधीनंतर योजनेचे आपोआप नूतनीकरण केले जाते.
हे नाविन्यपूर्ण बँकिंग उत्पादन सर्व देशांतर्गत शुल्क काढून टाकून, उत्तम प्रकारे पारदर्शक बँकिंग सुनिश्चित करून चिंतामुक्त बँकिंग अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाइन केले आहे. हे उत्पादन ग्राहकांना देशभरातील कोणत्याही एटीएममध्ये अमर्यादित ॲक्सेस सुविधा पुरविते आणि अतिरिक्त शुल्काच्या चिंतेपासून मुक्त करत कोणतीही शिल्लक राखण्याची लवचिकता प्रदान करून बँकिंगमधील पारदर्शकता पुन्हा परिभाषित करते. यामुळे ग्राहकांचे खरे स्वातंत्र्य अधिक सक्षम होईल आणि त्यांना एक अखंड बँकिंग अनुभव मिळेल. ग्राहक अॅक्सिस बँक ग्रॅब डील्स प्लॅटफॉर्मवर कॅशबॅक सारखे अतिरिक्त लाभ देखील मिळवू शकतात. या प्लॅटफॉर्मचे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा सारखे ३० हून अधिक भागीदार आहेत. शिवाय, ग्राहकांना ई डेबिट कार्ड वापरून केलेल्या सर्व व्यवहारांवर १% कॅशबॅक मिळेल तसेच इतर सर्व डेबिट कार्ड लिंक्ड फायद्यांसह, जसे की ३० दिवसांच्या आत डेबिट कार्ड वापरावर ५०० रुपयांचे ग्रॅब डील्स व्हाउचर, ५०० रुपयांपर्यंत ऑनलाइन रिवॉर्ड्स कार्डसह ईझी डिनर आणि अनेक गोष्टींवर १५% सवलत मिळू शकेल.
या घोषणेबाबत भाष्य करताना ॲक्सिस बँकेच्या ब्रांच बँकिंग, रिटेल लायबिलिटीज आणि प्रॉडक्टसचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि हेड रवी नारायणन म्हणाले,“ग्राहकांच्या सहभागाच्या नवीन डोमेनपर्यंत डिजिटल बँकिंग उंचावून आमच्या ग्राहकांच्या जीवनात आम्ही जी भूमिका निभावू शकतो त्याची पुर्नव्याख्या करण्यासाठी आम्ही सतत नावीन्यपूर्ण मॉडेल्सवर काम करत आहोत. सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेल्सच्या तत्त्वांचा समावेश करून आजच्या ग्राहकांच्या सतत बदलत्या पसंती आणि अपेक्षांशी जुळवून घेऊन, आमच्या ग्राहकांना एक परिवर्तनकारी बँकिंग अनुभव प्रदान करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
ग्राहक आता बचत खात्याची सदस्यता घेणे निवडू शकतात आणि सेवांसाठी आकारले जाणारे शुल्क किंवा किमान शिल्लक राखण्याची काळजी करावी लागत नाही. बँकिंग हे सहज, लवचिक आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे असले पाहिजे या आमच्या विश्वासाचा पुनरुच्चार या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होतो.”