४ जानेवारी २०२३ : आज २१व्या शतकावर ताबा मिळवण्याची संधी भारताकडे आहे. भारताला ईव्हींचे जागतिक केंद्र होण्याची जी संधी मिळाली आहे, त्या संधीपासून ओलाच्या महत्त्वाकांक्षा व योजनांनाही प्रेरणा प्राप्त झाली आहे. कंपनीने ओलाच्या पहिल्या स्कूटरची आणि जगातील सर्वांत मोठ्या टूव्हीलर प्लाण्टची घोषणा करून १५ ऑगस्ट २०२१ रोजी या प्रवासाची सुरुवात केली आहे. या घोषणेला अवघे १५ महिने झाले आहेत आणि उत्पन्न व व्याप्ती या दोन्ही निकषांवर ओला ही सर्वांत मोठी ईव्ही कंपनी ठरली आहे तसेच सर्वाधिक वेगाने वाढणारी कंपनीही आहे. कंपनीने २०२२ मध्ये सुमारे १,५०,००० ईव्हींची विक्री केली आहे आणि आपल्या मिशन इलेक्ट्रिकचा भाग म्हणून २०३० पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व टूव्हीलर्स व कार्स इलेक्ट्रिक असाव्यात या दृष्टीने कंपनी काम करत आहे.
आपल्या भविष्यकाळातील उभारणीसाठी ओलाने ३ पायऱ्यांचे धोरण आखले आहे:
१. उत्पादनाचे विविधीकरण व जागतिक व्याप्तीने उत्पादन: टूव्हीलर्स इलेक्ट्रिक केल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावरील जागतिक तसेच स्पर्धात्मक क्षमता विकसित करण्याची मुभा मिळाली आहे. महत्त्वाची तंत्रज्ञाने, पुरवठा साखळी आणि चार्जिंग संरचनेसारख्या संरचनेबाबत ओलालाही ही मुभा मिळाली आहे. भारतातातील सर्व २० दशलक्ष टूव्हीलर्स इलेक्ट्रिक झाल्यानंतर भारत ईव्हींची जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी बाजारपेठ होईल (वापरल्या गेलेल्या गिगावॅट अवर्सनुसार केलेले मापन- १०० गिगावॅट्स). अमेरिका व चीननंतर भारताचाच क्रमांक लागेल. टूव्हीलर्सचा हा पाया घातला गेल्यामुळे ओलाला भक्कम स्पर्धात्मक लाभ मिळेल आणि चारचाकी गाड्या इलेक्ट्रिक करण्याचे काम सोपे होईल. ओला एसवन या ओलाच्या प्रीमियम स्कूटर्सची व्याप्ती २०२२ या वर्षात वाढवण्यात आली. कंपनीने प्रीमियम स्कूटर बाजारपेठेचे (रु. १,००,०००हून अधिक किमतीच्या) संपूर्ण विद्युतीकरण (इलेक्ट्रिफिकेशन) केवळ एक वर्षात साध्य केले. २०२३ व २०२४ मध्ये कंपनी टूव्हीलर ईव्ही विभागात अन्य अनेक उत्पादने बाजारात आणणार आहे- मास मार्केट स्कूटर, मास मार्केट मोटरसायकल आणि अनेकविध अव्वल मोटरसायकल्स (स्पोर्टस्, क्रुझर्स, अॅडव्हेंचर आणि रोड बाइक्स) अशी उत्पादने कंपनी बाजारात आणणार आहे. टूव्हीलर्सच्या या भक्कम उत्पादनामुळे ओलाला सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी व इंजिने यांतील ईव्ही तंत्रज्ञान व पुरवठा साखळीमध्ये खूपच प्रबळ असा स्पर्धात्मक लाभ मिळत आहे आणि यामुळे कंपनी जागतिक दर्जाची चारचाकी उत्पादने अत्यंत स्पर्धात्मक दरबिंदूंवर बाजारात आणू शकणार आहे. ओलाची पहिली कार २०२४ मध्ये बाजारात येणार आहे आणि २०२७ पर्यंत कंपनीची ६ वेगवेगळी उत्पादने बाजारपेठेत असतील.
२. सेल तंत्रज्ञानात दंडात्मक एकात्मीकरण आणि महत्त्वाच्या पुरवठा साखळ्यांचे स्थानिकीकरण: कोअर सेल तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यास ओलाने २ वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि २०२२ मध्ये कंपनीने ओलाच्या बॅटरी इनोव्हेशन सेंटरमध्ये कामही सुरू केले. हे एक जागतिक दर्जाचे आस्थापन असून, येथून १,०००हून अधिक संशोधक भविष्यकालीन सेल तंत्रज्ञानावर काम करू शकतील आणि त्यांचे स्वत:चे आयपी उभारू शकतील. २०२३ सालाच्या अखेरीस, ओला ५ गिगावॅट क्षमतेच्या सेल उत्पादन कारखान्यात काम सुरू करणार आहे. या दशकामध्ये कारखान्याची क्षमता १०० गिगावॅटपर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षा कंपनीपुढे असेल. ओलाचे स्वत:चे तंत्रज्ञान व स्थानिक पुरवठा साखळी यांमुळे कंपनीला अन्य जागतिक व भारतीय कंपन्यांच्या तुलनेत भक्कम स्पर्धात्मक लाभ मिळत आहे.
३. १ल्या व २ऱ्या मुद्दयांचा लाभ घेत महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये जागतिक वितरण: १,००,००० ते ५०,००,००० या दरश्रेणीतील जागतिक दर्जाची उत्पादने, बळकट तंत्रज्ञान व स्थानिक कमी खर्चातील पुरवठा साखळी यांमुळे कंपनीला जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात करण्यासाठी तसेच आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिका, युरोप, आफ्रिका आदी महत्त्वाच्या बाजारपेठांमधील ईव्ही वाहतुकीच्या क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी आवश्यक तो लाभ प्राप्त होत आहे.
ओला या कामाप्रती वचनबद्ध आहे आणि या मार्गावरून पुढे जात आहे.
२०२२ हे वर्ष भारतातील ईव्ही क्रांती खऱ्या अर्थाने सुरू करणारे वर्ष म्हणून स्मरणात ठेवले जाईल. जून २०२१ मधील महिन्याला केवळ ४००० युनिट्स या संख्येवरून कंपनीचा मासिक दर आता २०२२च्या अखेरीस ८०,००० युनिट्सपर्यंत गेला आहे. ही २० पट वाढ आहे. २०२१ मध्ये कंपनीचा बाजारातील शिरकाव (पेनिट्रेशन) १ टक्क्याहून कमी असताना, केवळ एका वर्षात ते सुमारे ६ टक्के झाले आहे. भारतातील ईव्ही क्रांती केवळ शहरी भागापुरती मर्यादित नाही, तर देशभरात होत आहे. बेंगळुरू, पुणे, सुरत आदी शहरांमधील ईव्हींचे प्रमाण सुमारे २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
भारतात ईव्हींसाठी बाजारपेठ नेहमीच होती आणि नवीन व श्रेष्ठ तंत्रज्ञानाने युक्त ईव्ही स्वीकारण्यास तयारीही नेहमीच होती. हे श्रेणी १, २, ३ शहरे व ग्रामीण भागांतील ग्राहकांनी ईव्हींना दिलेल्या प्राधान्यातून स्पष्ट दिसत आहे.