होंडा रेसिंग इंडिया टीम २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी जपानला रवाना

37
Showing 17 of 17 media items ATTACHMENT DETAILS IDEMITSU-Honda-Racing

स्पोर्ट्सलँड सुगो (जपान), 23 जून २०२३ – २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) दुसऱ्या फेरीत केलेल्या कौशल्य प्रदर्शनानंतर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची (एचएमएसआय) इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या वीकेंडला तिसऱ्या फेरीसाठी सज्ज झाली आहे. स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट (जपान) येथे होणार असलेल्या या फेरीत दिमाखदार कामगिरी करण्यासाठी टीम उत्सुक आहे.

रेसिंगचा सीझन ऐन मध्यावर असून होंडा रेसिंग इंडियाने २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या दुसऱ्या फेरीच्या अखेरीस (एआरआरसी) एकूण ११ पॉइंट्स मिळवले असून एशिया प्रॉडक्शन २५० सीसीमध्ये (AP250cc) आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी टीम सज्ज आहे.

आगामी फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘जपानमध्ये होत असलेल्या एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी आम्ही सज्ज आहोत. मला खात्री आहे, की इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम या फेरीत कठोर परिश्रम करत आपले स्थान उंचावेल. स्पोर्ट्ललँड सुगो इंटरनॅशनल सर्किट आमच्या रायडर्ससाठी नवे असले, तरी अविरत प्रयत्न करत टीम नक्की चांगले यश मिळवेल. गुणवत्तेचा ध्यास घेतलेल्या आणि या प्रतिष्ठित चॅम्पियनशीपमध्ये ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रायडर्सना पाठिंबा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. या वीकेंडला जपानमध्ये त्यांची दमदार कामगिरी पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

एशिया प्रॉडक्शन (AP250) क्लासमध्ये एआरआरसी चार्जचे नेतृत्व आणि रेसिंग कौशल्याचे जबरदस्त प्रदर्शन अशी दुहेरी जबाबदारी कविन समर क्विंतल यांनी निभावली. २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या (एआरआरसी) दुसऱ्या फेरीत AP250cc मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे ते भारतीय टीममधले एकमेव रायडर आहेत. दुसऱ्या रेसमध्येही प्रगती करण्यासाठी कविन सज्ज होते, मात्र दुसऱ्या लॅपमध्ये बाइकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. असे असूनही सेपांग इंटरनॅशनल सर्किटच्या दुसऱ्या फेरीत त्यांनी २ पॉइंट्स मिळवत संपूर्ण चॅम्पियनशीपच्या पहिल्या १५ मध्ये आपले स्थान राखले.

Honda-Racing-India-team

चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीविषयी उत्सुकता दाखवत कविन समार क्विंतल म्हणाले, ‘एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या फेरीसाठी मी खूप उत्सुक आहे. स्पर्धा आणखी तीव्र असून प्रसिद्ध स्पोर्ट्सलँड सुगो इंटरनॅशनल सर्किट येथे या रेसिंग आव्हानाला तोंड देण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे. त्यासाठी मी कठोर परिश्रम केले असून कौशल्य उंचावण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यापूर्वी केलेल्या चुका टाळण्यावर माझा भर असेल. या वीकेंडला सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.’

दर्देवाने देशांतर्गत होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये झालेल्या दुखापतीमुळे मोहसिन परांम्बेन जपानमधील फेरीत सहभागी होणार नाहीत. ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.