होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे 2023 CB300F लाँच बुकिंग सुरू !

20
Load more ATTACHMENT DETAILS Honda-CB300F_Sports-Red

नवी दिल्ली११ सप्टेंबर २०२३ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे (एचएमएसआय) आज ओबीडी-२ चे पालन करणारी 2023 CB300F लाँच करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बिग बाइकपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या मोटरसायकलची स्पोर्टी कामगिरी व असामान्य रूप यामुळे CB300F खऱ्या अर्थाने स्ट्रीट फायटर बनली आहे. ग्राहकांना 2023 होंडा CB300F त्यांच्या जवळच्या बिगविंग वितरकांकडे बुक करता येणार असून तिची किंमत रू. १,७०,००० (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे.

2023 होंडा CB300F चे स्वागत करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘लाँचपासूनच CB300F लक्षवेधी ठरली आहे. स्ट्रीट फायटरचे स्पिरीट आणि कामगिरी, वैविध्यपूर्णता, आधुनिक वैशिष्ट्ये यांचा समतोल राखत बनवण्यात आलेली CB300F नव्या युगाच्या रायडर्सच्या स्टाइल, ताकद आणि आरामदायीपणाच्या अपेक्षा पूर्ण करणारी आहे. नवीन २०२३ मॉडेलमध्ये ओबीडी- २ ए इंजिन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे जबरदस्त रायडिंग आणि वेग अनुभवता येतो.’

honda logo

2023 CB300F च्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘2023 ओबीडी २ चे पालन करणारी CB300F लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. ही गाडी ग्राहकांना रायडिंगचा थरारक अनुभव देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. खऱ्या स्ट्रीट फायटरप्रमाणे CB300F आपली शहरी स्टाइल, जबरदस्त ताकद आणि वेगवान कामगिरीच्या जोरावर ग्राहकांची मने जिंकेल. या मोटरसायकलची बुकिंग सुरू झाल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत असून आता खुल्या रस्त्यावर तिचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नवी CB300F अप- गियर करा आणि रायडिंगचे साहस नव्याने अनुभवा.’

सामर्थ्यवान आणि आक्रमक कामगिरी

होंडा CB300F ताकदवान आणि वेगवान स्ट्रीट फायटर आहे. जबरदस्त कामगिरीसाठी यात २९३ सीसी, ऑइल- कुल्ड, ४ स्ट्रोक, सिंगल सिलेंडर बीएसव्हीआय ओबीडी – २ चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन देण्यात आले आहे, जे १८ किलोवॉट उर्जा आणि २५.६ एनएमचा पीक टॉर्क देते.

रस्त्यावरचे कोपरे असो किंवा शहरातली ट्रॅफिक, CB300F मधील ६-स्पीड गियरबॉक्सच्या मदतीने सहजपणे वाट काढता येईल, तर असिस्ट स्लिपर क्लचमुळे कमी ताकदीमध्ये सहजपणे गियर बदलता येते. तसेच यामुळे डाउन शिफ्टिंग करताना रियर व्हील व्हॉपिंग टाळले जाते.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार हाताळणी

CB300F मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान राइडचा प्रत्येक पैलू नियंत्रणाखाली राहील याची काळजी घेते. ड्युएल डिस्क ब्रेक्स (२७६ एमएम फ्रंट आणि २२० एमएम रियर) ड्युएल चॅनेल एबीएस आणि होंडाचे सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) सुरक्षा व कामगिरीची काळजी घेते. यातील गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स आणि ५- स्टेप अडजस्टेब रियर मोनो शॉक सस्पेन्शन रायडिंगचा आरामदायी अनुभव देते.

CB300F च्या आधुनिक व पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये ब्राइटनेस कमी- जास्त करण्याचे पाच स्तर देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर, फ्युएल गॉज, ट्विन ट्रिप मीटर्स, गियर पोझिशन इंडिकेटर आणि घड्याळ देण्यात आले आहेत. यात एसईडी लायटिंग सिस्टीम आणि अखंड कनेक्टिव्हिटीसाठी होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीम (एचएसव्हीसीएस) देण्यात आली आहे.

किंमतरंग आणि उपलब्धता

2023 CB300F OBD-II A डिलक्स प्रो व्हेरिएंट आणि तीन रंगांत – स्पोर्ट्स रेड, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक उपलब्ध करण्यात आली आहे. या मोटरसायकलची किंमत रू. १,७०,०००  (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे.

किंमत (एक्स शोरूम दिल्ली) रू,७०,०००
रंग स्पोर्ट्स रेड, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक