नवी दिल्ली, ७ जून २०२३ : ग्राहकांचा होंडाची दुचाकी खरेदी करण्याचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी तसेच दुचाकी क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज त्यांचा ‘एक्सटेंड वॉरंटी प्लस (ईडब्ल्यू प्लस)’ प्रोग्रॅम लाँच केला. कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त वॉरंटीची ही सुधारित आवृत्ती असून ती २५० सीसी पर्यंतच्या सर्व स्कूटर व मोटरसायकल्सवर उपलब्ध केली जाईल. दुचाकी क्षेत्रात अशाप्रकारची वॉरंटी उपलब्ध करणारी होंडा ही पहिलीच कंपनी असून त्यामुळे ग्राहकांचे समाधान वाढेल आणि काळजीही कमी होईल.
या अनोख्या प्रोग्रॅमळे ग्राहकांना गाडी खरेदीच्या तारखेनंतर ९१ दिवस ते ९ व्या वर्षापर्यंत अतिरिक्त वॉरंटी घेता येणार आहे. या प्रोग्रॅममध्ये ग्राहकांना १० वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी मिळेल, पण महत्त्वाचे म्हणजे त्यावर रिन्यूवलचा पर्यायही दिला जातो. या पर्यायामुळे गाडी विकल्यानंतरही वॉरंटी हस्तांतरित करता येते.
‘एक्सटेंड वॉरंटी प्लस’च्या या नव्या आत्तीमध्ये इंजिनचे मौल्यवान भाग आणि महत्त्वाच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल भागांसाठी सर्वसमावेशक कव्हरेज दिले जाते. ईडब्ल्यू प्लस प्रोग्रॅममध्ये ग्राहकांना तीन सुलभ पर्याय दिले जातात. – सात वर्ष जुन्या वाहनांसाठी ३ वर्षांपर्यंतची पॉलिसी, ८ व्या वर्षासाठी २ वर्षांची पॉलिसी आणि ९ वर्ष जुन्या वाहनांसाठी १ वर्षाची पॉलिसी. या पर्यायांमुळे सर्व स्कूटर मॉडेल्सवर १२०,००० किलोमीटर्सपर्यंत आणि सर्व मोटरसायकल मॉडेल्सवर १३०,००० किलोमीटर्सपर्यंत कव्हरेज मिळते.
ईडब्ल्यू प्लसची वैशिष्ट्ये
ईडब्ल्यू प्लसची वैशिष्ट्ये | |
विक्रीचा कालावधी | वाहनाची खरेदी केल्यानंतर ९१ दिवसांपासून ९ व्या वर्षापर्यंत |
पॉइंट ऑफ सेल | वर्कशॉप |
पॉलिसीचे उपलब्ध पर्याय | सात वर्ष जुन्या वाहनांसाठी ३ वर्षांपर्यंतची पॉलिसी, ८ व्या वर्षासाठी २ वर्षांची पॉलिसी आणि ९ वर्ष जुन्या वाहनांसाठी १ वर्षाची पॉलिसी |
संभाव्य ग्राहक | सद्य ईडब्ल्यू आणि ईडब्ल्यू नसलेले ग्राहक |
ग्राहकासाठी फायदे |
|
हा अशाप्रकारचा पहिलाच प्रोग्रॅम लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री व विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘वाहन खरेदी प्रक्रियेत ग्राहकाचे समाधान सर्वात महत्त्वाचे असते. त्यासाठी विक्री पश्चात सेवा दर्जेदार असावी लागते. आघाडीची दुचाकी उत्पादक या नात्याने होंडाने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आणि नवे मापदंड तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. गाडी खरेदीचा अनुभव नव्या उंचीवर नेण्याच्या हेतूने आम्ही ‘एक्सटेंड वॉरंटी प्लस’ प्रोग्रॅम तयार केला आहे. सर्व मौल्यवान सुट्या भागांसह १० वर्षांपर्यंतची एक्सटेंडेट वॉरंटी देणारा हा या क्षेत्रातील पहिला प्रोग्रॅम आहे. वेगवेगळे फायदे देणारा हा प्रोग्रॅम ग्राहक सेवा क्षेत्रात क्रांती घडवेल. यामुळे निष्ठावान ग्राहकवर्ग तयार करणे शक्य होईल. या प्रोग्रॅममुळे ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास आणखी दृढ होईल अशी खात्री वाटते.’
ग्राहकांना त्यांच्या सोयीने होंडाच्या कोणत्याही अधिकृत सर्व्हिस सेंटरवर या सेवेचा लाभ घेता येईल. त्यासाठी १५० सीसीपर्यंतच्या मॉडेलसाठी १३१७* रुपये, १५० ते २५०* सीसी मॉडेल्ससाठी १६६७* रुपये भरावे लागतील. वाहनाची खरेदी केले ते वर्ष आणि वाजवीपणा लक्षात घेऊन किंमत श्रेणी तयार करण्यात आली आहे.