होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे नागपूर, महाराष्ट्र येथे नव्या झोनल ऑफिसचे उद्घाटन

38

नागपूर : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाच्या दुचाकी ब्रँडने आज नागपूर येथे आपल्या नव्या झोनल ऑफिसचे (विभागीय कार्यालय) उद्घाटन केले.

१८ वा मजला, वेद सोलेटेयर, नीव मलिका अपार्टमेंट, ५ वे क्रॉस बी स्टेशन, धर्मपेठ एक्सटेन्शन, धर्मपेठ येथे वसलेल्या या झोनल ऑफिसचे उद्घाटन होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे (एचएमएसआय) अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमु ओतानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. विनय धिंग्रा – वरिष्ठ संचालक, एचआर, अडमिन, आयटी आणि कॉर्पोरेट अफेयर्स, एचएमएसआय, श्री. ताकेशी कोबायाशी – संचालक, विपणन आणि विक्री, एचएमएसआय आणि श्री. योगेश माथुर – संचालक, विक्री आणि विपणन, एचएमएसआय आदी उपस्थित होते.

होंडा हा महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांसह संपूर्ण पश्चिम भागातील सर्वात विश्वासार्ह दुचाकी ब्रँड आहे. नव्या झोनल ऑफिसमुळे एचएमएसआयला राज्यात सर्वदूर विस्तार करणे आणि ११०० टचपॉइंट्सच्या मदतीने पश्चिम भागातील ग्राहकांना सेवा देणे शक्य होणार आहे.

नागपूर झोनल ऑफिस हा एचएमएसआयच्या रुपंतर प्रकल्पाचा भाग आहे आणि त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आल्यामुळे रियल टाइम अनुभवासह व्हर्च्युअल प्रशिक्षण देणे सहज शक्य होते. नव्या ऑफिसमुळे वितरकांचा कौशल्य विकास करणे आणि पर्यायाने ग्राहकांना जास्त चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.

एचएमएसआयच्या नागपूर येथील नव्या झोनल ऑफिसचे उद्घाटन करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे (एचएमएसआय) अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, पश्चिम भागातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडचे स्थान मिळवण्यासाठी योगदान देणाऱ्या ग्राहकांचे मी आभार मानतो. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य वाहन उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे आणि हे राज्य एचएमएसआयसाठी महत्त्वाच्या  बाजारपेठांपैकी एक आहे. नागपूरमध्ये नवे झोनल ऑफिस सुरू करून पश्चिम भागातील आमची व्याप्ती वाढवण्याचे आणि ग्राहकांना जास्त प्रभावीपणे सेवा देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.