नवी दिल्ली : होंडा कार्स इंडिया (एचसीआयएल) ही भारतातील प्रिमियम कार्सची अग्रगण्य उत्पादक कंपनी त्यांची लोकप्रिय फॅमिली सेदान होंडा अमेझचा १० वर्धापन दिन साजरा करत आहे. एप्रिल २०१३ मध्ये भारतात पहिल्यांदा लाँच करण्यात आलेली ही कार तेव्हापासून होंडाची सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल बनले आहे आणि तिचा विभाग व उद्योगामध्ये प्रबळ बाजारपेठ स्थान निर्माण केले आहे. अमेझने गेल्या १० वर्षांदरम्यान ५.३ लाखांहून अधिक ग्राहकांना आनंद व अभिमान दिला आहे आणि सध्या देशामध्ये प्रत्येकी दोनपैकी एका होंडा कारची विक्री होत आहे, ज्यामुळे एचसीआयएलची भारतातील विक्री ५३ टक्के आहे. ग्राहकांना सर्वात प्रगत उत्पादने व सेवा देत त्यांच्याप्रती होंडाच्या अविरत कटिबद्धतेशी बांधील राहत २०१३ मध्ये पहिल्यांदा लाँच झाल्यापासून भारतात विक्री करण्यात आलेल्या सर्व होंडा अमेझ ई२० मटेरिअल कॉम्पॅटिबल आहेत.
- ५.३ लाखांहून अधिक कुटुंबांचे अभिमानी मालकीहक्क
- सध्या भारतातील होंडासाठी सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल म्हणून योगदान
होंडा अमेझ समकालीन सेदान आहे, ज्यामध्ये कामगिरी व इंधन कार्यक्षमतेचे परिपूर्ण संतुलन आहे. या कारमध्ये होंडाचे प्रगत पॉवरट्रेन, आकर्षक बोल्ड डिझाइन, अत्याधुनिक व एैसपैस जागा असलेले इंटीरिअर्स, सर्वोत्तम ड्रायव्हिंग कार्यक्षमता, प्रगत वैशिष्ट्ये आणि सुरक्षितता तंत्रज्ञान आहेत. गेल्या १० वर्षांमध्ये मॉडेलमध्ये अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत, ज्यामध्ये दोन जनरेशन्स आणि इतर अनेक अपडेट्सचा समावेश आहे. ही वैयक्तिक ग्राहकांमध्ये सर्वाधिक विक्री होणारी सेदान आहे, जी पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे, तसेच लहान वेईकल्सवरून अपग्रेड करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ताकुया त्सुमुरा होंडा अमेझच्या १० वर्षांच्या प्रवासाच्या यशस्वी उपलब्धीबाबत आनंद व्यक्त करत म्हणाले, ‘‘आज भारतातील आमच्या प्रवासाने मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे, जेथे होंडा अमेझने ५.३ लाखांहून अधिक ग्राहकांसह या बाजारपेठेत दशकभर उपस्थिती पूर्ण केली आहे. आमच्या ग्राहकांसाठी प्रबळ ब्रॅण्ड अपील, आकर्षक स्टाइलिंग, सर्वोत्तम कामगिरी, टिकाऊपणा, निर्माण दर्जा, सुरक्षितता व आरामदायी अनुभवासह आमचा पोर्टफोलिओ ऑफरिंग ‘वन क्लास अबव्ह सेदान एक्स्पेरिअन्स’मधील हे धोरणात्मक प्रिमियम एण्ट्री मॉडेल आहे. आम्हाला आनंद होत आहे की, अमेझने आमच्या भारतातील व्यवसायामध्ये लक्षणीयरित्या योगदान दिले आहे आणि आमच्या लाइन-अपमधील सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल बनले आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘अमेझचे ४० टक्के पहिल्यांदा खरेदी करणारे ग्राहक आहेत आणि प्रगत सीव्हीटी ऑटोमॅटिक व्हेरिएण्ट्ससाठी वाढती पसंती दिसण्यात आली आहे, ज्यामध्ये विद्यमान मॉडेल विक्रीमध्ये जवळपास ३५ टक्के योगदान आहे.’’
एप्रिल २०१३ मध्ये लाँच करण्यात आलेली फर्स्ट जनरेशन होंडा अमेझच्या मार्च २०१८ पर्यंत २६ लाख युनिट्सची विक्री झाली. तिच्या सेकंड जनरेशनमध्ये मे २०१८ मध्ये लाँच झाल्यापासून होंडा अमेझच्या २.७ लाख युनिट्सची विक्री झाली आहे, ज्यामुळे हा देशातील सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड बनला आहे.
होंडा अमेझची निर्मिती फक्त भारतात राजस्थान येथील होंडाच्या तापुकारा प्लांट येथे केली जाते, ज्यामधून देशांतर्गत व निर्यात व्यवसायाची पूर्तता केली जाते. मेड इन इंडिया होंडा अमेझ दक्षिण आफ्रिका व सार्क देशांमध्ये निर्यात केली जाते. भारतातील २३६ शहरांमधील ३२५ सुविधांच्या प्रबळ नेटवर्कसह अमेझने द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांमध्ये प्रबळ लोकप्रियता व उपस्थिती निर्माण केली आहे, जेथे या प्रदेशांमध्ये ६० टक्के मॉडेल विक्री करण्यात आली आहे.
अमेझमध्ये १.२ लिटर आय-टेक पट्रोल इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन ६००० आरपीएममध्ये ९० पीएस शक्ती आणि ४८०० आरपीएममध्ये ११० एनएम टॉर्क देते. तसेच ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व सीव्हीटी (कन्टिन्युअस्ली व्हेरिएबल ट्रान्समिशन) अनुक्रमे प्रतिलिटर १८.६ किमी आणि प्रतिलिटर १८.३ किमी इंधन कार्यक्षमता देतात.
होंडा अमेझची पीस ऑफ माइण्ड सर्विस ऑफरिंगसह दर्जात्मक ३ वर्षे अनलिमिटेड किमी वॉरंटी आणि मेन्टेनन्सचा कमी खर्च ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रबळ घटक आहेत. भारतात विक्री करण्यात आलेल्या सर्व होंडा अमेझ ई२० मटेरियल कॉम्पॅटिबल आहेत आणि ग्राहक कारमधील कोणतेही घटक बदलण्याची गरज न लागता त्यांच्या विद्यमान होंडा अमेझमध्ये नवीन श्रेणीतील ई२० इंधनाचा वापर करू शकतात.
सेफर कार्स फॉर आफ्रिका कॅम्पेनअंतर्गत २०१९ मध्ये आफ्रिका स्पेक व्हेरिएण्टची क्रॅश चाचणी करण्यात आली होती तेव्हा मेड इन इंडिया होंडा अमेझला ग्लोबल एनसीएपीकडून प्रबळ ४-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते.