दिल्ली, : होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) या भारतातील प्रिमिअम कार्सच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज भारतातील वर्ल्ड प्रिमिअर इव्हेण्टमध्ये होंडाची नवीन जागतिक एसयूव्ही – होंडा एलीव्हेटचे अनावरण केले. यंदा सणासुदीच्या काळादरम्यान लाँच करण्याचे नियोजित असण्यासह ऑल न्यू एलीव्हेटचे जागतिक स्तरावर उत्पादन व विक्री करण्याकरिता भारत पहिला देश असेल. एलीव्हेटचे सुरूवातीचे सादरीकरण स्थानिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित असताना भारताचा जगातील इतर भागांकरिता नवीन मॉडेलसाठी महत्त्वाचे निर्यात हब म्हणून सेवा देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर एसयूव्हींसाठी प्रबळ मागणीची पूर्तता होईल.
· एलीव्हेट होंडाच्या जागतिक एसयूव्ही लाइनअपमधील नवीन मिड-साइज एसयूव्ही आहे
· बोल्ड व मस्क्युलाइन एक्स्टीरिअर डिझाइनसह लक्षवेधक फ्रण्ट फेस, शार्प कॅरेक्टर लाइन्स आणि अद्वितीय रिअर डिझाइन रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात.
· भारत ऑल न्यू एलीव्हेट लाँच करण्यासाठी पहिली बाजारपेठ असणार. भविष्यातील मॉडेलसाठी प्रमुख निर्यात हब असण्याचा मनसुबा.
· ‘अबर्न फ्रीस्टाइलर’च्या भव्य संकल्पनेवर विकसित करण्यात आलेली एलीव्हेट होंडाच्या जगासाठी पॅशन, निर्धार व सहयोगात्मक दृष्टिकोनाला सादर करते, जेथे व्यक्ती कोणत्याही मर्यादांशिवाय स्वप्न पाहू शकतात, मुक्तपणे काम करू शकतात आणि अधिक मुक्तपणे जीवनाचा आनंद घेऊ शकतात.
· अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी टेक्नॉलॉजीजच्या संपूर्ण श्रेणीमध्ये रस्त्यावरील सर्वांसाठी सुरक्षितता प्रगत करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या होंडाच्या दीर्घकालीन ‘सेफ्टी फॉर एव्हरीवन’ दृष्टिकोनावर आधारित होंडा सेन्सिंगच्या अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम (एसडीएएस)चा समावेश आहे.
· एलीव्हेट होंडाकडून २०३० पर्यंत भारतात लाँच करण्याचे नियोजन असलेल्या ५ नवीन प्रिमिअम एसयूव्हींपैकी पहिली एसयूव्ही आहे.
· या एसयूव्हीवर आधारित बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल (बीईव्ही) होंडाच्या कार्बन न्यूट्रॅलिटीप्रती जागतिक दृष्टिकोनाशी बांधील राहत ३ वर्षांत भारतात लाँच करण्याची योजना आहे.
‘अर्बन फ्रीस्टाइलर’च्या भव्य संकल्पनेवर विकसित एलीव्हेटचा सक्रिय जीवनशैली व जागतिक मानसिकता असलेल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा मनसुबा आहे. या वेईकलमध्ये व्हिज्युअली आकर्षक, अविश्वसनीयरित्या वैविध्यपूर्ण, आरामदायी व फन-टू-ड्राइव्ह एसयूव्हीची निर्मिती करण्याकरिता अत्याधुनिक आकर्षकता व कार्यक्षमता समाविष्ट आहे, ज्यामुळे ही एसयूव्ही शहरामधील व शहराबाहेरील साहसी राइडसाठी सुसज्ज आहे.
एलीव्हेट मिड-साइज एसयूव्ही आहे. या वेईकलमध्ये बोल्ड व मस्क्युलाइन एक्स्टीरिअर डिझाइनसह आकर्षक फ्रण्ट फेस, शार्प कॅरेक्टर लाइन्स व अद्वितीय रिअर डिझाइन आहे, जे एकत्रितपणे रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी वेईकल निर्माण करतात. पुढील बाजूस होंडाचे सिग्नेचर ग्रिल, स्लीक एलईडी हेडलाइट्स आहेत, तर साइड प्राफोइलमधून वेईकलची स्पोर्टी विशिष्टता दिसून येते आणि मागील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण टेलगेट डिझाइन व एलईडी टेललाइट्स आहेत.
स्टेटस, आरामदायीपणा व सक्रिय जीवनशैलीचा शोध घेत असलेल्या तरूण ग्राहकांच्या गरजा व महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी थायलंडमधील होंडा आरअॅण्डडी एशिया पॅसिफिक केंद्राने ऑल न्यू एलीव्हेट विकसित केली आहे. भारतातील आरअॅण्डडी टीमने विशेषत: व्यापक बाजारपेठ सर्वेक्षणांच्या माध्यमातून संभाव्य लक्ष्य ग्राहकांना समजण्यावर काम केले आहे, ज्यामधून एसयूव्ही खरेदी करण्यासाठी त्यांचे तीन मुख्य प्रेरणास्रोत दिसून येतात, ते म्हणजे स्टायलिश बोल्ड एक्स्टीरिअर डिझाइन, प्रबळ सेफ्टी पॅकेजसह अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सेफ्टी आणि लांबचा प्रवास करताना ओव्हरऑल कम्फर्टसह इंटीरिअर रूमीनेस अॅण्ड स्पेस (इंटीरिअरमध्ये एैसपैस जागा).
जागतिक अनावरणाबाबत आपले मत व्यक्त करत होंडा मोटर कं. लि.च्या रिजिनल युनिटचे प्रमुख (आशिया व ओशियाना) आणि एशियन होंडा मोटर कं. लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तोशिओ कुवाहरा म्हणाले, ‘‘जगातील तिसरी मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ असलेला भारत देश होंडासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिक मॉडेल लाँच करण्यासाठी पहिला देश म्हणून ऑल न्यू एलीव्हेटच्या आजच्या वर्ल्ड प्रिमिअरमधून होंडाची देशाप्रती योजना व महत्त्वाकांक्षांसाठी कटिबद्धता दिसून येते.
भारतातून जगभरातील विविध प्रदेशांना निर्यात दरवर्षी सातत्याने वाढत आहे. स्थानिक व जगभरातील ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी उत्पादने वितरित करण्यासाठी दर्जात्मक मानकांच्या उच्च स्तरासह भारत होंडासाठी सर्वात महत्त्वाचे निर्यात हब बनले आहे. २०५० कडे वाटचाल करत होंडा कार्बन न्यूट्रॅलिटी आणि आमच्या मोटरसायकल्स व ऑटोमोबाइल्सचा समावेश असलेले शून्य वाहतूक अपघाताला चालना देण्याचा प्रयत्न करते. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी होंडाचा २०४० पर्यंत भारतासह जगभरात बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल्स व फ्यूएल सेल इलेक्ट्रिक वेईकल्सचे विक्री गुणोत्तर १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मनसुबा आहे. सुरक्षिततेसाठी आम्ही प्रगत तंत्रज्ञानांमध्ये वाढ करण्यासह जगभरात होंडा सेन्सिंगचे विस्तारीकरण आणि वाहतूक अपघात कमी करण्यासाठी सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा अधिक प्रसार करत राहू.’’
होंडा कार्स इंडिया लि.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ताकुया त्सुमुरा म्हणाले, ‘‘ऑल न्यू एलीव्हेटचे अनावरण करण्याच्या माध्यमातून आम्ही भारतातील वाढत्या एसयूव्ही विभागातील होंडाच्या प्रबळ उत्पादन ऑफरिंगसह नवीन प्रवास सुरू करत आहोत. होंडाचे सेदान विभागांमध्ये प्रबळ नेतृत्व व लोकप्रियता आहे. नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत असलेले होंडा निष्ठावान ग्राहकांमध्ये व एकूण बाजारपेठेत उच्च अपेक्षा आहे.
आम्हाला विश्वास आहे की, एलीव्हेट आमच्या निष्ठावान ग्राहकांसोबतचे संबंध अधिक दृढ करेल आणि लवकरच सिटी व अमेझ व्यतिरिक्त व्यवसायाची तिसरी प्रबळ आधारस्तंभ बनेल. बाजारपेठेतील आमची प्रिमिअम उपस्थिती वाढवण्यासाठी आमचे प्रबळ उत्पादन धोरण आहे आणि एलीव्हेट २०३० पर्यंत भारतात होंडाकडून लाँच करण्यात येणाऱ्या ५ नवीन एसयूव्हींपैकी पहिले मॉडेल आहे.’’ ‘‘इलेक्ट्रिफाईड पॉवरट्रेन्सवर लक्ष केंद्रित करत कार्बन न्यूट्रॅलिटीप्रती आमच्या जागतिक दृष्टिकोनाशील बांधील राहत आम्ही भारतात पुढील ३ वर्षांमध्ये या एसयूव्हीवर आधारित होंडाची पहिली बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल (बीईव्ही) लाँच करणार आहोत,’’ असे ते पुढे म्हणाले.