हॉकीमध्ये यजमान एसएनबीपीला दुहेरी मुकुट

31

पुणे २४ जून २०२३ – यजमान एसएनबीपी, मोरवाडी संघाने ‘सुभद्रा’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना १५ वर्षांखालील गटातून मुले, मुलींच्या विभागात विजेतेपद मिळविले.

संस्थेच्या चिखली येथील डॉ. दशरथ भोसले हॉकी मैदानावर झालेल्या सामन्यात मुलांच्या विभागात अंतिम लढतीत एसएनबीपीने नाशिकच्या के.एन. केला प्रशाला संघाचा एका गोलच्या पिछाडीनंतर ३-१ असा पराव केला. केला प्रशालेकडून सिकंदर शेखने २५व्या मिनिटाला गोल लकरून संघाचे खाते उघडले होते. मध्यंतराला त्यांनी आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात अथर्व कुमारने २८व्या मिनिटाला गोल करून संघाला १-१ असी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर नीरज लांडगेने ३९ आणि ४५व्या मिनिटाला गोल करून एसएनबीपीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

मुलींच्या विभागातील अंतिम सामन्यात एसएनबीपी मोरवाडी संघानेच विजेतेपदाला गवसणी घालताना आपल्याच चिखली येथील संघाचा ८-१ असा धुव्वा उडवला. सुकन्या सायाकर (३रे, १४वे आणि १८वे मिनिट) आणि मैथिली भुजबळ (१२, १३ आणि १७वे मिनिट) दोघींनी साधलेली हॅटट्रिक संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. साई सपकाळ (११वे मिनिट) आणि तनिष्का जाधव (१५वे मिनिट) यांनी अन्य गोल केले. चिखली संघाकडून एकमात्र गोल उन्ना शेखने ८व्या मिनिटाला केला.

स्पर्धेत एकूण सहा शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एसएनबीपी मोरवाडी, एसएनबीपी चिखली, के. एन. केला स्कूल, नाशिक, ज्योती स्कूल, सेंट ज्यूड स्कूल, सेंट अॅण्ड्र्यूज स्कूल या संघाचा समावेश होता. मुलींच्या विभागातून ४ संघ सहभागी झाले होते.

निकाल –
मुले (१५ वर्षांखालील) अंतिम सामना – एसएनबीपी, मोरवाडी ३ (अथर्व कुमार २८वे, नीरज लांडगे ३९, ४५वे मिनिट) वि.वि. के.एन. केला स्कूल, नाशिक १ (सिकंदर शेख २५वे मिनिट) मध्यंतर ०-१

उपांत्य फेरी – एसएनबीपी मोरवाडी ४ (नीरज लांडगे ४थे, अथर्व कुमार १३, १४वे मिनिट, यश लांडे २५वे मिनिट) वि.वि. ज्योती स्कूल १ (अयान सय्यद २५वे मिनिट) मध्यंतर ३-०

उपांत्य फेरी २ – के.एन. केला स्कूल नाशिक ३ (अभिषेक मुळे २रे मिनिट, जयेश फुलपगारे ४थे मिनिट, इक्बाल पटेल ८वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी, चिखली ०. मध्यंतर ३-०

पहिली फेरी – एसएनबीपी, चिखली १ (नरेश कोठारी १०वे मिनिट) वि.वि. सेंट अॅण्ड्र्यूज स्कूल १. मध्यंतर – १-०
ज्योती शाळा १ (विवेक भामरे १३वे मिनिट) वि.वि. जयहिंद हायस्कूल ०, मध्यंतर १-०

मुली अंतिम फेरी – एसएनबीपरी मोरवाडी ८ (सुकन्या सयाकर ३, ४, १८वे मिनिट, सई सकपाळ ११वे, मैथिली भुजबळ १२, १३, १७वे मिनिट, तनिष्का जाधव १५वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी चिखली १ (उन्ना ८वे मिनिट) मध्यंतर ६-१

उपांत्य फेरी १ – एसएनबीपी चिखली २ (गार्गी रासकर ५वे, दिप्ती कुमारी २४वे मिनिट) वि.वि. सेंट ज्युड प्रशाला ० मध्यंतर १-०

उपांत्य फेरी २ – एसएनबीपी मोरवाडी ६ (साई सपकाळ ५वे मिनिट, रिया पिल्ले १०वे, रितिका पवार १२वे मिनिट, मैथिली भुजबळ १८, ३४वे मिनिट, तनिष्का जाधव० वि.वि. सेंट अॅण्ड्यूज प्रशाला ० मध्यंतर ३-०