हूनरटेकचा अमेरिकेत विस्तार

84

पुणे, ता.१८ नोव्हेंबर २०२२ : हूनरटेक (Hoonartek)या डेटा, कर्ज वितरण आणि विश्लेषण सेवा देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीने अमेरिकेतही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असून, न्यू जर्सी येथे Ab Initio सेंटर ऑफ एक्सलन्स (COE)हे पहिले कार्यालय सुरू केले आहे. याद्वारे येथील विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी नवकल्पना आणि उपाय देण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग, प्रोग्राम मॅनेजमेंट, प्रभावी उपाययोजना, डेव्हॉप्स आणि अॅश्युरन्ससह नाविन्यपूर्ण व्यवस्थापित सेवांसह वैविध्यपूर्ण सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करून अमेरिकेच्या बाजारपेठेत धोरणात्मक सहयोग वाढवण्यात येणार आहे.

कंपनीच्या धोरणाचा एक भाग म्हणून हे केंद्र दाखल करण्यात आले आहे. Ab Initio ग्राहकांना समाधानकारक सेवा देऊन हूनरटेकचे स्थान अधिक मजबूत करत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना हे हूनरटेकच्या Ab Initio मध्ये नेतृत्व क्षमतांचा विस्तार करण्याच्या आणि मेटाडेटा ऑटोमेशन, सेल्फ-सर्व्हिस, गव्हर्नन्स, क्लाउड डिप्लॉयमेंट, ट्रान्सफॉर्मेशन, टर्न की सोल्यूशन्स क्षमता वाढवण्याच्या धोरणाचा भाग आहे.

  • न्यूजर्सी येथे Ab Initio सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू

कंपनीच्या अमेरिकेतील विस्ताराबाबत बोलताना, हुनारटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीयूष पांडे म्हणाले, “ आम्ही आखलेल्या आमच्या विकास योजनेचा केंद्रबिंदू अमेरिका आहे. समर्पित आणि कुशल मनुष्यबळ, मजबूत पायाभूत सुविधा आणि २०३२ पर्यंत अंदाजे १९.५ अब्ज डॉलरच्या सॉफ्टवेअर उपलब्धता करण्याच्या योजनेसह आम्ही येथे प्रवेश केला असून, आम्हाला या बाजारपेठेतून खूप आशा आहेत. या विशाल बाजारपेठेत विस्तार वाढवून उत्तम योगदान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

आम्ही Ab Initio तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन उत्कृष्ट एंड-टू-एंड सोल्यूशन्स वितरीत करत असून,आम्ही अमेरिकेत नाविन्यपूर्ण व्यवसाय देत आहोत. यूके, आशिया, युरोप आणि दक्षिण आफ्रिकेप्रमाणे येथेही यश मिळवण्यासाठी Ab Initio या गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ निगडीत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेतील ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास कटीबद्ध आहोत. ”

Ab Initio Delivery COE हुनरटेकला एंटरप्राइजेसना त्यांच्या डेटा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षमतेसह बँकिंग आणि डिजिटल उपाययोजना आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यास मदत करेल. आठशेपेक्षा अधिक सल्लागार असलेली मजबूत बुटीक संस्था, हूनरटेक अमेरिकेमध्ये तिचे कार्य वाढवण्यासाठी आणि सीओईद्वारे तंत्रज्ञान उपाययोजना देण्यासाठी आपली क्षमता वाढवत आहे.