हि बातमी वाचाल तर महिण्याकाठी हजारो रुपये कमवाल

206

जरा दोन गोष्टीबद्दल बोलूया. पहिली, सामान्य माणसाला शून्यातून स्वतः चा असा उद्योग उभारायला किती मेहनत आणि वेळ द्यावा लागतो?

आणि दुसरी, पृथ्वीवर साचणाऱ्या विघटन न होणाऱ्या पदार्थांचा म्हणजेच प्लास्टिक, इ वेस्ट आणि टायर्स सारख्या वस्तू/पदार्थांचा वाढत चाललेला खच.

आता तुम्ही म्हणाल या दोन गोष्टींचा एकमेकांसोबत काय संबंध?

तर, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिने टाकाऊ पासून टिकाऊ या लहानपणीच्या कार्यानुभवाच्या विषय एवढा सिरीयस घेतला की थेट एक स्टार्टअपचं सुरू करून इंडस्ट्रीला एक नवीन प्रेरणा दिली आहे.

हेही वाचा : तुम्हाला माहित आहे का राज ठाकरेंचा राजीनामा संजय राऊतांनी लिहिला होता…जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पूजा आपटे यांचा ‘नेमितल’ नावाचा स्टार्टअप आहे जो टाकाऊ टायर्स पासून चपलांचे जोडे बनवून पर्यावरण पूरक ‘पाऊल खुणा’ निर्माण करत आहेत! 

आणि मुख्य म्हणजे शिक्षण सुरू असताना त्यांनी हा भीम पराक्रम करून दाखवला आहे!

२७ वर्षीय पूजा नवी दिल्लीच्या द न्यू एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधून पारंपरिक ऊर्जा या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होत्या.

हेही वाचा : पुण्यात खळबळ : दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुखी संसाराला कुणाची नजर लागली? प्रेमविवाह केला, नंतर…

शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असताना थिसिस साठी अभ्यास करताना त्यांना जाणवले की पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या पदार्थांवर आज देखील खूप कमी लोक काम करत आहेत.

त्यामुळे याच विषयात त्यांनी काम करण्याचे ठरवले आणि त्यासाठी विघटन न होणारा पदार्थ त्यांनी निवडला ‘टायरचा रबर!’

त्यानुसार त्यावर रिसर्च करून अभ्यास करायला सुरुवात केली.

अनुमानाअंती त्यांना कळून चुकले की यासाठी मोठं भांडवल हवं आणि त्यातून येणारा रिटर्न हा सुद्धा खूप कमी आणि उशिराने मिळतो.

त्यातल्या त्यात कायदेशीर तक्रार अशी होती की सरकारने टायरचं रिसायकल करण्यावर सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली आहे.

आलेल्या निष्कर्षावर न थांबता पूजा यांनी आपला रिसर्च आणि अभ्यास चालूच ठेवला.

हेही वाचा : PRINT AND DIGITAL MEDIA : प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती

असेच गुगल वर सर्फिंग करत असताना त्यांना आफ्रिकेतील एका जमातीबद्दल कळाले जे पायतान म्हणून फेकलेल्या जुन्या टायरचा वापर करताय.

आणि पूजा यांना आपल्या बिझनेसच प्रोडक्ट सापडले! त्यांनी ठरवले की त्या स्वतःच्या अशा चपला डिझाईन करतील ज्या टायर पासून तयार झालेल्या असतील आणि काळानुरूप फॅशनेबल आणि स्टायलिश असतील!

तर मग ठरलं! पूजा यांनी मोच्याच्या मदतीने टायर पासून काही मोजड्यांच्या प्रोटो टाइप तयार केले आणि ते घेऊन त्या पोहोचल्या थेट ‘स्टार्टअप इंडियाच्या’ राष्ट्रीय मंचावर.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्या अशाच प्रकारच्या विविध स्पर्धेत आपला सहभाग नोंदवू लागल्या.

नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्या सहभागी झाल्या आणि ‘अपकमिंग वुमन आंथ्रोपृनर’ या विभागात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला!

आणि याच माध्यमातून ‘ब्लीन्क ग्रीन’ या कंपनीच्या माध्यमातून ‘नेमिताल’ या ब्रँड चा उदय झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूजा यांनी आपला संपूर्ण वेळ या प्रोजेक्टला द्यायचे ठरवले आणि त्यानुसार त्या कामाला लागल्या.

आणि मार्केटिंगसाठी पूजा यांनी निवडला आजच्या घडीला अग्रेसर असलेला प्लॅटफॉर्म ‘सोशल मीडिया’.

पूजा यांनी इन्स्टाग्राम वर आपल्या प्रोफाइल वर आपल्या डिझायनर चपलांचे काही फोटो शेअर्स केले आणि बघता बघता आजतागायत १००० जोडे पायतान हे विकले गेले आणि जवळपास तब्बल ४०० किलो टायरच्या रबरचे रिसायकलिंग झाले!

मुळात टायरचा रबर हा प्रक्रिया करून मजबूत बनवलेला असतो. त्यामुळे हजार किलो वजनाच्या गाड्याचे वजन पेलून सुद्धा ते लॉंग लास्टिंग राहतात.

त्यातल्या त्यात मानवाचे वजन हे गाड्यांच्या तुलनेत नगण्य असल्याने या रबर पासून तयार झालेले चप्पल आणि सॅंडल हे सुद्धा लॉंग लास्टिंग राहतात.

नेमितालच्या या फूट वेअर्स मध्ये कोल्हापुरी चप्पल, सँडल, ट्रॅडिशनल मोजडी सुद्धा मिळतात आणि हिल्स सुद्धा!

रुपये ६०० पासून ते १००० पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे हव्या त्या साईझ मध्ये नेमितालच्या चपला या उपलब्ध आहेत.

चप्पल बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल पूजा सांगतात, चप्पल साठी नेमिताल टायरच्या पट्ट्या विकत घेते.मुंबईत मशिनद्वारे हव्या असलेल्या आकारात त्या कापून मिळतात.

टायर सोडून बाकी लागणारे साहित्य हे कंपनी वेंडर कडून विकत घेते. कार्डबॉर्डचा बॉटम, टायरची पट्टी आणि टेलर ने बनवून दिलेले कापडी पट्टी यांपासून चप्पल तयार होते.

या स्टार्ट अप पासून मिळणाऱ्या उत्पन्ना बद्दल विचारले असता पूजा सांगतात, महिना काठी त्यांना ५०,००० पर्यंत उत्पन्न यामधून मिळते.

कोविड काळात थोडाफार परिणाम झाला. पण सप्टेंबर महिन्यापासून बिझनेस पूर्ववत झाल्याचे त्या सांगतात!

आपल्या या स्टार्टअप आणि त्यामागे घेतलेल्या मेहनती बद्दल बोलताना पूजा सांगतात, महिलांसाठी चप्पल बनवणाऱ्या इंडस्ट्री मध्ये महिलांचे प्रमाण हे १% सुद्धा नाही.

फुटवेअर क्षेत्रात महिला काम करू शकत नाही याला त्या स्वतः अपवाद आहेत. या व्यवसायात योग्य संवाद झाल्यास कोणतीही अडचण येत नाही. असा त्यांचा स्वतः चा अनुभव आहे.

एकूणच, महिला सक्षमीकरण,स्टार्ट अप आणि टाकाऊ पासून टिकाऊ या तिन्ही गोष्टींमध्ये पूजा आपटे आणि त्यांची नेमिताल कंपनी ही नवं उद्योजक आणि आपला समाज या दोहोंच्या साठी प्रेरणा आहे.