पुणे : हिमालया वेलनेस कंपनी या आघाडीच्या वेलनेस ब्रॅन्ड ने आज त्यांचे नवीन उत्पादन हिमालया नॅचरल ग्लो रोज फेसवॉश ची सुरुवात केल्याची घोषणा केली. या सुरुवाती बरोबरच आता त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) च्या विमेन्स क्रिकेट टिमच्या सहकार्याने #NotFair ही मोहिमही सुरु केली आहे. आपल्या पहिल्या दोन मॅचेस दरम्यान आरसीबीच्या खेळाडू #NotFair हा लोगो त्यांच्या टोपी/हेल्मेट वर प्रदर्शित करत होत्या, त्यामुळे या मोहिमे विषयी लोकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यानंतर आता ‘हिमालया रोज ब्युटी fair & beauty is not equal to color’ चा संदेश दिसणार आहे, यामुळे तुमच्या चेहेर्याबरोबरच तुमच्या त्वचेचा रंग कसा महत्त्वाचा आहे हे कळते. या मोहिमेची सुरुवात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे (८ मार्च) औचित्य साधून करण्यात आली असून त्याच बरोबर उत्पादनाचीही सुरुवात यावेळी करण्यात आली.
#NotFair या मोहिमेचा हा उद्देश आहे की सौंदर्या विषयीचे गैरसमज दूर करुन सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे हा आहे. यातून त्वचेच्या रंगाचे महत्त्व अधोरेखित करण्या बरोबरच वैविध्य साजरे करणे आणि समाजातील अन्यायकारक सौंदर्य मानकांना आव्हान देणे. या अंतर्गत स्वत:वरील प्रेमाला वाढवून प्रत्येक व्यक्तीतील सौंदर्य मग ते कोणत्याही रंगाचे असो साजरे करण्यात येणार आहे.
हिमालया आणि आरसीबीची विमेन्स आयपीएल (मधील भागीदारी म्हणजे सौंदर्यातील सकारात्मकतेचा प्रसार करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. या मोहिमेतून सांगितला जाणारा प्रमुख संदेश ‘ब्यूटी हॅज नो कलर. एव्हरी फेस हॅज अ स्पेशल ग्लो’ असून प्रत्येक व्यक्तीच्या चमकीचे कौतूक करण्याबरोबरच त्याचा आनंद घेतला जावा.”
गेल्या ९० हून अधिक वर्षांपासून हिमालया वेलनेस कंपनी ही प्रत्येक घरात वेलनेस आणण्या बरोबरच प्रत्येक हृदयात आनंद देण्यात आघाडीवर आहे.
“हिमालया मध्ये आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे एक सौंदर्य असते.” असे हिमालया वेलनेस कंपनी चे बिझनेस डायरेक्टर श्री. राजेश कृष्णमूर्ती यांनी सांगितले “ विमेन्स प्रिमियर लीग मधील आरसीबी सह भागीदारी करतांना आंम्हाला आनंद होत आहे. ही संस्था सर्वसमावेशकते सह वैविध्य अशी आमच्या मुल्यांसह काम करत आहे. आंम्हाला आशा आहे की उत्पादन आणि मोहिम यामुळे लोकांना सौंदर्याविषयीची मते मोडण्यास प्रोत्साहन मिळेल.”
श्रीमती गायत्री कालिबान कॅटेगरी मॅनेजर- फेसवॉश यांनी ब्रॅन्ड विषयी आपले मत व्यक्त केले “ हिमालया नॅचरल ग्लो फेसवॉश हा नैसर्गिक गुलाबांच्या अर्कांसह त्वचेच्या आवडीच्या घटकांनी तयार केलेला आहे. हा फेसवॉश कोणत्याही पॅराबेन्स, थॅलेट्स आणि सिलिकॉन्स विरहीत आहे. हा फेसवॉश त्वचेसाठी चांगल्या अशा पीएच फॉर्म्युल्याने युक्त आणि १०० टक्के पुर्नवापर करण्यास योग्य ट्यूब ने युक्त आहे. गुड फॉर स्कीन गुड फॉर दि प्लॅनेट!”
हिमालया नॅचरल ग्लो रोज फेसवॉश त्वचेतील अशुध्दी काढून टाकतो त्यामुळे त्वचा नैसर्गिकपणे उजळते.
यावेळी बोलतांना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चे प्रमुख आणि व्हाईस प्रेसिडेंट राजेश मेनन यांनी सांगितले “ आमची मुल्ये जसे सर्वसमावेशकता आणि वैविध्य जपणारी संस्था असलेल्या हिमालया बरोबर सहकार्य करतांना आंम्हाला आनंद होत आहे. आरसीबी म्हणून आम्ही ज्या गोष्टी आमच्यासाठी लाभाच्या आहेत त्यासाठी दीर्घकाळ सहकार्य करण्यावर भर देत असून आमच्या फॅन्सना प्रोत्साहन देऊन त्यांचे जीवन सकारात्मकतेने जगण्यास प्रोत्साहीत करत आहोत.”