हिमालया बेबीकेयर तर्फे जगभरांतील वडीलांच्या सन्मानासाठी दि ऑटोग्राफ्स मोहिमेची सुरुवात

30
Himalaya

हिमालया बेबीकेअर या बेबी केअर आणि वेल बीईंग क्षेत्रातील प्रसिध्द अशा ब्रॅन्ड तर्फे हृदयस्पर्शी अशा मोहिमेची सुरुवात केली असून यामध्ये बहुमुल्य अशा पितृत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे. ब्रॅन्ड कडून ‘ऑटोग्राफ’ नावाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला असून यामध्ये वडील आणि मुलांमधील अजोड बंध योग्य रितीने अधोरेखित करण्यात आले आहे.

या फिल्म मध्ये पितृत्वाचा अनुभव, अव्यक्त प्रेम, त्याग आणि वडीलांच्या संघर्षाचे कथन करण्यात आले आहे. एक दमलेला आणि मध्यमवर्गीय बाप कामावरुन दमून घरी येतो आणि अतिशय दमलेला असल्यामुळे अजाणतेपणी आपल्या वडीलांकडे दुर्लक्ष करतो. पण लहान मुलगी त्याला सरप्राईज देण्यासाठी त्याचे डोळे बंद करुन तिचा हिरो कोण आहे ते विचारते.

एक सुपरहिरो किंवा एक ॲक्टर आहे असे म्हणून वडील सांगतात आणि पहातात तर ती मुलगी आपल्या वडीलांकडे तेच हिरो आहेत असे सांगून त्यांचा ऑटोग्राफ मागते. या हृदयद्रावक अशा कृतीमुळे तिच्या वडीलांना त्यांच्या वडीलांची आठवण येते. ते त्यांच्या वडीलांच्या खोलीत जातात आणि त्यांना हॅप्पी फादर्स डे म्हणून शुभेच्छा देऊन त्यांचाही ऑटोग्राफ मागतात.या अनपेक्षित अशा गोष्टीने भारावलेले वयस्कर वडील ही ऑटोग्राफ देतात आणि त्यांचा हा पहिला ऑटोग्राफ असल्याचे सांगतात. अशा या वागणूकीमुळे तरुण वडीलांना अतिशय सुंदर अशा नातेसंबंधांचे महत्त्व कळते. या व्हिडिओ मध्ये तीन पिढ्या एकत्र दाखवण्यात आल्या असून यावेळी हिमालया बेबी केअर सर्व वडीलांना हॅप्पी फादर्स डे च्या शुभेच्छा देत आहे.

हिमालया वेलनेस कंपनी च्या बेबीकेअर चे बिझनेस हेड श्री चक्रवर्ती एन व्ही यांनी सांगितले “ या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही जगभरांतील वडीलांकडून केल्या जाणार्‍या त्याग आणि समर्पणाचा सन्मान करण्याची संधी आम्ही साधत आहोत. जसजसे आपण मोठे होऊ लागतो तसतसे विविध कारणांमुळे आपण आपल्या वडीलांपासून दूर जाऊ लागतो.

आम्ही वडील आणि त्यांच्या मुलांमधील प्रेम पुन्हा जागृत करण्याचा आणि प्रत्येकाला त्यांच्या वडिलांबद्दल त्यांचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांना अपार आनंद मिळून नाते आणखी मजबूत होते. आम्हाला आशा आहे की ही हृदयस्पर्शी कथा लोकांच्या हृदयाला स्पर्श करेल आणि या सुंदर बंधांचे संरक्षण आणि जतन करणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर देईल.”