हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी  

156

वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचा अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा तसेच ‘लव्ह जिहाद’ विरोधी कठोरात कठोर कायदा करावा !

हडपसर – तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम 1995’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदू, ख्रिश्चन आणि अन्य पंथीयांची कोणतही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बळपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. परिणामी संरक्षण दल, रेल्वे नंतर देशभरात 8 लाख एकरपेक्षा जास्त भूमीची मालक ‘वक्फ बोर्ड’ झाली आहे. एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. याद्वारे हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि हिंदूंची मंदिरेही सुरक्षित नाहीत. पुण्याच्या आजूबाजूला देखील असे प्रकार आढळून आले आहेत त्यामुळे धार्मिक पक्षपात करणारा, देशाच्या सुरक्षेला बाधक ठरणारा, लँड जिहादसाठी प्रोत्साहन देणारा ‘वक्फ ऍक्ट’ रहित करावा तसेच लव्ह जिहाद विषयीच्या वाढत्या घटना पहाता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गुरुवार, दिनांक 12 जानेवारी या दिवशी हडपसर गाव वेशीबाहेर, हडपसर पुलाखाली, हडपसर (गीता भुवन हॉटेल समोर) या ठिकाणी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ सदस्य आणि चिंतामणी प्रासादिक दिंडीचे खजिनदार ह.भ.प. दत्तात्रय तुकाराम चोरघे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री ऋषिकेश कामठे, भाजपचे नगरसेवक श्री.मारुती आबा तुपे, भाजपचे मध्य हवेली तालुका अध्यक्ष धनंजय आप्पा कामठे, सुभेदार दादासाहेब किल्लेदार (निवृत्त) आदी मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी ‘लव्ह जिहादसाठी होणारा अर्थपुरवठा व त्याद्वारे होणार्‍या आतंकवादी कारवायांची चौकशी करा’, ‘लव्ह जिहाद रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करा’ आदी विविध मागण्यासह निवेदनावर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली, हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे मिलिंद धर्माधिकारी यांनी सांगितले. 

     हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. ‘लव्‍ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदूंची वंशवृद्धी रोखण्‍याचे हे षड्यंत्र आहे. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा असे रणरागिणीच्या कु. क्रांती पेटकर यांनी या वेळी सांगितले.