मुंबई, ८ डिसेंबर २०२२ : भारतीय वंशाच्या न्यूरोसायंटिस्टने स्थापन केलेली हिंदुजा समूह समर्थित युनिकॉर्न माईंडमेझ ही एआय प्रणीत न्यूरोटेक्नॉलॉजीच्या विकासातील जागतिक अग्रणी असून अमेरिका आणि भारतामध्ये आपला कार्याविस्तार करत आहे. माईंडमेझ तंत्रज्ञान जगभरातील १३० हून अधिक अग्रणी वैद्यकीय केंद्रांवर वापरण्यात येत आहे. भारतात, संपूर्ण मालकीची उपकंपनी माईंडमेझ इंडिया द्वारे शिखर सरकारी रुग्णालय AllMS, नवी दिल्ली यासह डझनहून अधिक संस्थांमध्ये याचा वापर होत आहे.
अमेरिकी बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी माईंडमेझ ने निवडक व्हिब्रा हॉस्पिटलमधील रूग्णांसाठी माईंडमेझचे डिजिटल हेल्थ टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म (MindPod® आणि MindMotion®GO) रुग्णालयात आणि घरी बसविण्यासाठी रुग्णालयातील गंभीर रुग्णाची नंतर घ्यायची काळजी या क्षेत्रात अग्रणी असलेल्या अमेरिकेतली व्हिब्रा हेल्थकेअरसोबत भागीदारी केल्याचे जाहीर केले. व्हिब्रा हेल्थकेअर अमेरिकेतली १९ राज्यांमध्ये ९० हून अधिक विशेष रुग्णालये तसेच संक्रमणकालीन काळजी युनिट्स/सुविधा केंद्रात कार्यरत आहे. सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन लोक न्यूरोलॉजिकल विकारांनी ग्रस्त आहेत.
“माईंडमेझ गंभीर न्यूरोलॉजिकल आजार असलेल्या रुग्णांसाठी वास्तविक परिस्थितीवर आधारित उपायांच्या विकासाद्वारे सातत्यपूर्ण शुश्रूषे दरम्यान न्यूरो रिकव्हरी पुन्हा परिभाषित करण्यासाठी वचनबद्ध आहे,” असे माईंडमेझचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तेज ताडी म्हणाले. “आम्ही डॉक्टरांना शक्तिशाली, डिजिटली-सक्षम, अत्याधुनिक साधने प्रदान करण्यावर तसेच रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना वापरण्यास सुलभ, आकर्षक आणि सहजी उपलब्ध होतील अशा उपायांनी सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. मेंदूच्या आरोग्यामध्ये चांगला बदल तसेच रुग्णाच्या परिणामांमध्ये अर्थपूर्ण सुधारणा करण्याची बांधिलकी आणि खरी क्षमता या दोन्ही गोष्टी जोपासणारा जागतिक दर्जाचा भागीदार आम्हाला व्हिब्रा द्वारे मिळाला आहे.”
माईंडमेझ स्ट्रोक/ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी, स्पाइनल कॉर्ड इंज्युरी आणि पार्किन्सन्स रोग इत्यादीसारख्या न्यूरोलॉजिकल रोगांसाठी नवीन सॉफ्टवेअर-आधारित हस्तक्षेप आणि मूल्यांकन पुरविते तसेच जुनाट आजारांच्या दीर्घकालीन व्यवस्थापनादरम्यान रुग्णाच्या कार्याचे परीक्षण आणि मोजमाप करणारी क्षमता प्रदान करते. गेम-आधारित उपचार पद्धतीचा वापर पारंपरिक/सध्याच्या ठरलेल्या पद्धतींच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर सुधारित परिणामांसह पुनर्वसन अधिक आकर्षक बनवते (उदाहरणार्थ – व्हीलचेअरवर जखडून गेलेले आणि गतिशीलता परत मिळविण्यासाठी धडपडत असलेले काही रुग्ण माईंडमेझच्या मदतीमुळे आता स्वत:च्या पायावर चालत आहेत आणि जवळपास सामान्य जीवन जगत आहेत.)
“माईंडमेझने आमच्या टीमला केवळ त्यांच्या तांत्रिक क्षमतेच्या सामर्थ्याने प्रभावित केले असे नाही तर जगभरातील देशांमध्ये स्ट्रोक आणि इतर न्यूरोलॉजिकल आजार असलेल्या रुग्णांसाठी वास्तवात अवलंबता येणारे शुश्रूषा मार्ग वापरण्याच्या त्यांच्या अनुभवाने देखील प्रभावित केले आहे,” असे व्हिब्रा हेल्थकेअरचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड हॉलिंगर म्हणाले.